अमळनेर येथील ढेकू रोडवरील टेकडीवरच न्यायाधिशांचीही निवास्थाने उभारण्यात येणार

अमळनेर(प्रतिनिधी) पोलिस वसाहतीसोबत आता न्यायाधीशांची निवासस्थानेदेखील ढेकू रोडवरील टेकडीवर बांधण्यात येणार असून सार्वजनिक बांधकाम खात्याने सव्वा एकर जागेचा ताबा जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजीव पांडे यांच्याकडे देण्यात आला.
या दोन्ही विभागांचे निवासस्थाने जवळच होणार असून त्यांचा निवासाच प्रश्न यामुळे सुटणार आहे.
ढेकू रोडवरील नियोजित न्यायाधीश निवासस्थान जागेचा ताबा सोमवारी अमळनेर येथील जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश .आर.पी.पांडे  यांच्याकडे मंडलाधिकारी  तारे यांनी जळगांव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश .गोविद सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत सोपवला.  या वेळी अमळनेर येथील दिवाणी न्यायाधीश व. स्तर.  आर.एम. कराडे, तहसीलदार मिलिंद वाघ, अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुनील पाटील तसेच न्यायालय अधीक्षक आर.एस. ठाकूर तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *