खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून म्यान केल्या तलवारी ; आमदारांशी जुळवून घेत कशी वाढवली ठेकेदारी..

भाग १....... भाग २ पुढील भागात......

अमळनेर(खबरीलाल) गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांना कडवी झुंज देत भाजपाकडून निवडणूक लढवलेल्या अनिल भाईदास पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते पडली होती. मतांचे ध्रुवीकरण झाल्यामुळे त्यांचा पराभव झाला होता. तर नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदानाच्याच दिवशी बोगस मतदानाच्या मुद्यावरून आमदार शिरीष चौधरी आणि त्यांच्यात “फाइट” होऊन वातावरण “टाईट” झाले होते. त्यामुळे या दोघांचे कधीच सूत जमणार नाही, असे प्रत्येकाला वाटत होते. पण गेल्या पाच वर्षात अनिल भाईदास यांनी कार्यकर्त्यांना अंधारात ठेवत आपल्या तलवारी मॅन करून आपली ठेकेदारी वाढवण्यातच धन्यता मानली आहे.
तालुक्यातील हिंगोणे येथील रहिवाशी असलेले अनिल भाईदास पाटील हे राजकीय वर्तुळात “एबीपी” म्हणून ओळखले जातात. त्यांनी मार्केट कमिटी, अमळगांव-पातोंड जिल्हा परिषद गटाचे सदस्यत्व, जिल्हा बँकेवर संचालक पदावर काम केले आहे. माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांच्या मुशीत ते तयार झाले आहे. कार्यकर्ता म्हणून काम करतानाच ते तालुक्यात भाजपाचे कणखर नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यामुळेच २००९ मध्ये तत्कालीन आमदार डॉ.बी.एस.पाटील यांचे तिकीट कापून त्यांचेच कार्यकर्ते अनिल भाईदास पाटील यांना तिकीट देण्यात आले. यामुळे पक्षांतर्ग डॉ.बी.एस. पाटील यांनी बंड पुकारून अपक्ष उमेदवारी केली. यातच मतांचे ध्रुवीकरण होऊन कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या पदरात आमदारकी पडली. पुन्हा २०१४ मध्ये अनिल भाईदास पाटील यांनाच तिकीट मिळाले. या वेळी संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही मोदी लाट असल्याने भाजपाने दिलेला कोणताही उमेदवार सहज निवडून येणार होता. याच वेळी नंदुरबारहून शिरीष चौधरी यांनी थेट अमळनेरमध्ये एन्ट्री केली. त्यामुळे त्यांच्यासह भाजपाकडून अनिल भाईदास पाटील आणि राष्ट्रवादीकडून माजी आमदार साहेबराव पाटील यांच्यात तिरंगी लढत रंगली. यात स्थानिक दोघांना धोबीपछाड मारीत अपक्ष आमदार म्हणून शिरीष चौधरींनी बाजी मारली आणि अमळनेर मतदार संघाचे राजकारणाला वेगळीच कलाटकणी मिळाली.

मुद्द्यांचे गुद्दे विसरले…

गेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत बोगस मतदानावरून शिरीष चौधरी आणि अनिल भाईदास पाटील यांच्यात आणि कार्यकर्त्यांत चांगलीच जुंपली होती. हा मुद्द्यांचा विषय थेट गुद्द्यांवर आल्याने निवडणुकीला गालबोट लागले होते. यामुळे शिरीष चौधरी यांचे कट्टर विरोधक म्हणून अनिल भाईदास पाटील यांची ओळख निर्माण झाली. त्यामुळे गेल्या काही वर्षांत दोघांमध्ये राजकीय धुसफूस सुरू राहील, असे कार्यकर्त्यांसह मतदारांनाही वाटले होते. पण पाच वर्षात अनिल भाईदास पाटील यांनी आमदार शिरीष चौधरी यांच्या विषयी ”ब्र” शब्दही तोंडातून काढला नाही. त्यांनी आपली तलवार मॅन्य करीत आमदार शिरीष चौधरी यांच्याशी आतून सूत जुळवून घेतले. त्यामुळे आमदारांनी अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी मागणी केलेल्या अर्थ संकल्पातील अनेक कोटींचे कामे त्यांनी केली आहेत. त्यांनी द्वेषाच राजकारण न करता आमदार चौधरींच्या कुठल्याच कामांची एक तक्रार देखील केली नाही. उलट यातून मिळणाऱ्या रग्गड पैशांतून आपली ठेकेदारी वाढवून घेतली आहे. ज्या मतदारांच्या हक्कासाठी विरोधक म्हणून लढले पाहिजे होते, ते त्यांनी केलेच नाही. विशेष म्हणजे विद्यमान आमदारांच्या सर्वच गोष्टींना मुख समंती देत त्यांनी एक चकार शब्दही विरोध केलेला नाही, हे अमळनेरकर जनतेने पाच वर्ष उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. कार्यकर्त्यांनाही आता हळूहळू ही बाब लक्षात येऊ लागली आहे. झी २४ तासच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी ”याची देही, याची डोळा” अनुभवही घेतला आहे. त्यामुळे अनिल भाईदास पाटील हे मुद्द्यांचे गु्द्दे विसरले की काय, असा प्रश्न मतदार विचारू लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button