खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

पाच वर्ष झुलवला वचननाम्याचा हिंदोळा ; मतदारांनो आता आपणच घेऊया धांडोळा

अमळनेर (खबरीलाल विशेष) बघता, बघता पाच वर्ष सरली.. निवडणुकीचा बिगुल वाजला.. पुन्हा आपल्या विकासाची स्वप्न घेऊन उमेदवार आपल्या घरी-दारी येतील. भाऊ, नाना, दादा, काका, ताई, माई म्हणून मस्का मारतील. पुन्हा नवा ‘वचननामा’ आपल्यापुढे सादर करतील. पण मागच्या वचननाम्यात अश्वासनांची कोणती खैरात वाटली होती, त्यातील एकवचनही आपल्या लक्षात नसले. पण एक समाजाचा जागल्या म्हणून तो वचननामा ‘खबरीलाल’ आपल्यापुढे घेऊन आला आहे. जागृत मतदार म्हणून आपणही त्याचे अवलोकन करा, विचार करा आणि वचननाम्यात कोण, कोणती वचने (आश्वासने) दिली होती. ती किती पूर्ण झाली, याचे ऑडिट आता आपणच करू….

आमदार शिरीष चौधरींनी पाच वर्षापूर्वी जनतेच्या दरबारात सादर केलेला वचननामा जसाचा तसाच

 

अमळनेर शहरासाठी नियोजनबध्द आराखडा…

अमळनेर शहरात ‘नियमित व सुरळीत दररोज पाणीपुरवठा’ करण्यासाठी कटीबध्द राहणार,

अमळनेर शहरातील तसेच नवीन वसाहत व कॉलनी परिसरातील गटारी व रस्ते यांचे ‘डांबरीकरण, काँक्रीटीकरण’ प्रथम प्रधान्याने करुन देणार…

जळोद येथून अमळनेर शहरासाठी नविन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कलाली येथे ‘नविन जॅकवेल टाकून तसेच बोरी नदीवर बंधारा बांधून पाणीपुरवठ्यात वाढ करणार, अमळनेर शहरात आवश्यक त्या ठिकाणी महिलांसाठी व पुरुषांसाठी सर्व सोयींयुक्त असे ‘अत्याधुनिक सुलभ शौचालये उभारुन त्याची व्यवस्था नामांकित सेवाभावी संस्थेमार्फत करुन त्याची योग्यता टिकवून ठेवणार.

विदेशी कंपन्यांच्या सहकार्याने अमळनेर शहर व परिसरातील संपूर्ण पथदिवे बदलून ८०% विजेची बचत करणारे नवीन तंत्रज्ञानाचे एल.ई.डी. लाईटस् बसवुन शहर व परिसर प्रकाशमय करणार. तसेच शहरातील रस्त्यांवर आकर्षक सिंगल पोल पथदिवे बसवून सुशोभिकरण करणार, ERemont नगरपालिकेच्या माध्यमातून नियोजनबध्द प्रशस्थ नविन व्यापारी संकूल उभारुन अतिक्रमित बांधवांचे पुर्नवसन अग्रक्रमाने करून बेरोजगारी दूर करण्यासोबत नगरपालिकेस आर्थिक सबलता प्राप्त करुन देणार.

अतिक्रमित धारकांचे पुर्नवसन करणेसाठी व्यापारी संकुलनात गाळे घेणेकामी बँक व इतर पतसंस्थांकडून कायदेशिररितीने आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देणार. • फेरीवाले, लोटगाडी व इतर छोटे-मोठे व्यवसायिकांसाठी ‘हॉकर्स झोन’ संकल्पना राबविणार.

नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक प्रभागात संगणकीकृत समस्या निवारण कक्ष उभारणारा

शहरातील तसेच कॉलनी परिसरातील ओपन स्पेसमध्ये बालोद्यान, सामाजिक सभागृह, विहार, जॉगिंग ट्रॅक, नाना-नानी पार्क उभारुन परिसर सुशोभित करणार.

सर्व शासकीय कार्यालय एकाच जागेवर येण्यासाठी शहरात भव्य प्रशासकीय इमारतीची निर्मितीसाठी प्रयत्न करणार.

अमळनेर शहरातील व तालुक्यातील पत्रकारांसाठी ‘पत्रकार भवन’ उभारणार.

अमळनेर शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून ५ आरोग्यकेंद्रे उभारणार

ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या हक्काचे सभागृह उभारुन समस्या निवारण्यासाठी ‘सहाय्य केंद्र’उभारणार ‘वृद्ध, निराधार विधवा, परितक्यांसाठी शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी मार्गदर्शन कक्ष उभारणार

अमळनेर शहरात सर्वसोयींयुक्त डेली भाजीपाला मार्केट उभारणार व जुने व्यापारी संकुलांचे नुतनीकरण करणार

अमळनेर शहरात सुसज्ज असा ‘जलतरण तलाव’ उभारणार.

  प्रत्येक प्रभागामध्ये सर्वसोयींयुक्त ‘ग्रंथालये उभारणार

अमळनेर शहरात सर्व आधुनिक सोयींयुक्त वातानुकुलीत व्यायामशाळा’ उभारणार…

ताडेपुराभागातील ताडे नाल्याचे सुशोभिकरण करून पिकनिक स्पॉट, चौपाटी, नौकाविहार आदी सोयींयुक्त प्रेक्षणिय स्थळ करणार

अमळनेर शहरातील स्मशानभूमींचे आधुनकीकरण व सुशोभिकरण करणार

उद्योग समुहाच्या आर्थिक सौजन्याने २ नवीन सुसज्ज ‘रामरथ’ (शववाहीनी) उपलब्ध करुन देणार

सर्वसेवाभावी संस्था, सेवानिवृत्त अधिकारी, समाजसेवक यांच्या मदतीने ‘अमळनेर विकासासाठी’संघटना स्थापन करू

अमळनेर शहरात ‘ग्रीन अमळनेर-क्लीन अमळनेर’ हा संकल्प राबवून हजारो वृक्षांची लागवड करणार. . ‘नगरपालिकेला अत्याधुनिक संगणीकृत’ करण्यास शासनस्तरावर प्रयत्न करणार व सर्व ऑनलाईन सूविधा उपलब्ध करणार.. BPO स्थापन करून आपल्या समस्या आपण मोबाईल किंवा ई-मेल केल्यास त्याचे २४ तासात निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार.


शिक्षण…..

मतदार संघातील युवकांसाठी पोलिस भरती, सैनिक भरती, आर.पी.एफ., रेल्वे भरती इ. साठी विशेष प्रशिक्षण केंद्र उभारणार. विद्यार्थ्यांना ह्या स्पर्धात्मक युगामध्ये विविध प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी. वेगवेगळ्या स्पर्धापरीक्षांबाबत तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मदतीने मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणार.

‘वाचाल तर वाचाल’ ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांकरिता ‘गांव तेथे वाचनालय सुरु करु.
• शासनातर्फे वेगवेगळ्या समाजातील मुला-मुलींकरिता शहरात वसतिगृहांची सोय तसेच जुन्या वसतिगृहांची दुरुस्ती करण्यात येईल. इंटरनेट सुविधा, मेडिकल सुविधा, ग्रंथालये उभारण्यात येतील.

राज्य व केंद्र स्तरीय शासकीय योजना, आरोग्य विषयक योजना, उद्योजक विषयक योजना, स्पर्धा परीक्षा करिअर मेळाव्यांचे आयोजन करणार.

‘ई लर्निंग स्कूल’ शहरी व ग्रामीण भागातील शाळांसाठी शासन तसेच सेवाभावी उद्योग समुहाच्या मदतीने ई लर्निंग धोरण प्राधान्याने राबविणार, रिसर्चसाठी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप योजना राबविण्यात येईल ETH – education to home या मार्फत Online शिक्षण आपल्या घरी या डॉ. विजय भाटकर जी संकल्पना आपल्या गांवात राबवू.

युवक आणि युवती…..

 

 प्रत्येक वर्षी युवक व युवतींचे ‘रोजगारमेळावे घेऊन बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यांमध्ये १००% नोकरी मिळवून देणेसाठी प्रयत्न करणार.

 युवक व युवतींसाठी ‘रोजगारप्रशिक्षण देऊन रोजगाराची साधने उपलब्ध करुन देणार..

कुशल व अकुशल युवक व युवतींसाठी ‘विशेष प्रशिक्षण केंद्र’आयोजीत करुन नोकरीची संधी उपलब्ध करुन देऊ.

जगाच्या संपर्कात रहावे म्हणून मोफत वाय-फायझोन उभारणार.

 UPSC आणि MPSC साठी विशेष मार्गदर्शन व स्पर्धा परिक्षांचे आयोजन व यासाठी AC व Online Book असलेल्या ग्रंथालयाची स्थापना करु. गरीब व गरजू युवक व युवतींसाठी उद्योग समुहाच्या वतीने ‘मोफत बस पासेस’ उपलब्ध करुन देणार.

रस्ते, वीज व पंचायतराज

संपूर्ण मतदार संघातील सर्व रस्ते नुतनीकरण व मजबुतीकरण करु.

 शहरे व गावां गावांमधील ‘रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येईल. नवीन जोड रस्ते तयार करुन गावा गांवातील अंतर कमी करण्यात येईल तसेच शेतरस्ते तयार करणार.

 ग्रामीणभागासह शहरातील वस्त्यांमध्ये, कॉलन्यांमध्ये प्राधान्याने रस्ते व विजेची सोय उपलब्ध करणार.

मतदार संघातील एकही गावात अंधार राहणार नाही यासाठी भारनिमय बंद करण्यासाठी उपाययोजना करु.

ग्रामपंचायत सदस्यांना प्रशिक्षण व ग्रामपंचायत मदत केंद्र निर्माण करणार,

बचतगट…

 

बचतगटातील महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारुन त्यांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंना ‘मार्केटींग व बाजारपेठ उपलब्ध करण्यास मदत करु.

अमळनेर मतदार संघातील बचत गटांना उद्योग समुहाच्या माध्यमातून ‘आर्थिक सहाय्य करुन मोठ्या शहरांमध्ये आयोजीत केलेल्या ‘प्रदर्शनामध्ये भाग घेण्यास मदत करु.

मतदार संघातील सर्व बचतगटांना आर्थिक सबलीकरण करुन त्यांचे जीवनमान उचवण्याचे प्रयत्न करु.

बचत गटांमार्फत महिलांचा विशेष सहभाग घेवून ‘स्वच्छ शहर-सुंदर अमळनेर’शहराची संकल्पना राबवू.


तिर्थक्षेत्र विकास

संत सखाराम महाराज वाडी संस्थान व नदी परिसर, कपिलेश्वर मंदिर, मंगळग्रह मंदिर, गुरुदत्त मंदिर (जवखेडा), शिवधाम मंदिर,रत्नापिंप्री, कार्तिक स्वामी मंदिर,अंतुर्ली, बद्रीनाथ मंदिर, बहादरपुर, तिर्थक्षेत्रांसाठी विविध विकास कामे करुन परिसर सुंदर करु.

‘गुरुवर्यपूज्य सानेगुरुजीयांचे भव्य स्मारक उभारुन ऑडिओ-व्हिडाओ, जीवन चरित्र तत्वज्ञान केंद्राची स्थापन करु.

क्रिडा …..

 

मतदार संघात सर्व अत्याधुनिक सोयींयुक्त ‘गांव तिथेव्यायामशाळा’ उभारणार..

जिल्ह्यातील क्रिडा क्षेत्रात तरुणांना त्यांच्या योग्यतेनुसार राज्य व देशपातळीवर खेळण्याची संधी उपलब्ध करुन आवश्यक ते सहकार्य केले जाईल तसेच तालुका क्रिडा संकुलाचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण केले जाईल.

उद्योग.

 

 अमळनेर मतदार संघामध्ये येणाऱ्या काळात “सुतगिरणीची उभारणी करुन हजारो स्थानिक बेरोजगारांना युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देऊ

शेती पुरक उद्योग निर्माण करुन त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देऊ.

अमळनेर मतदार संघामध्ये असलेल्या मोठे उद्योगांना सर्वतोपरी सहाय्य करुनउद्योगधंदा वाढीस मदत करुन युवकांना रोजगार उपलब्ध करुन देऊ.

लघु उद्योग, महिला बचतगट उत्पादक वस्तु, कुटिर उद्योग यांना आर्थिक सहाय्य मिळवून देणेसाठी प्रयत्न करुन महिला व युवतींना रोजगाराची निर्मिती करणार.

कृषि …..

 

शेतकरी बांधवांना नवनवीन बि-बियाणे, शेती अवजारे व शेती विषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी म्हणून प्रत्येक वर्षी ‘भव्यकृषिप्रदर्शनाचे आयोजन करणार.

शेतात तयार झालेल्या चांगल्या प्रतिच्या शेतमालाला ग्राहकांपर्यंत थेट विक्रीसाठी जवळच्या मोठ्या शहरात प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करुन देणार.

 कृषि प्रदर्शनाच्या माध्यमातून शास्त्रोक्त पध्दतीचा शेतीविषयक तज्ञांकडून मार्गदर्शन व मेळाव्यांचे आयोजन करणार. माती परिक्षण व फिरते मार्गदर्शन केंद्र कार्यान्वीत करणार.

शासन व कृषिमहाविद्यालयामार्फत नव-नवीन तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करु. शेतकऱ्यांकरिता शेतीला पुरक असा जोडधंदा, दुग्धोपादक, कुकुट पालन, शेळी-मेंढी पालन व त्या संबंधित छोटे कुटीरोद्योग व्यवसायांना चालना देणार व शासन स्तरावरुन आर्थिक सहाय्य केंद्र उभारणार. • तापी नदीवरील बंद पडलेल्या तालुक्याशी संबंधीत असलेल्या सिंचन योजना कार्यान्वीत करु ऑनलाईन विक्री केंद्र स्थापना करु.

जैविक शेतीसाठी प्रयत्न करुन ग्रामउद्योगासाठी सरकारमान्य उपक्रम राबवू.

सिंचन.

 

संपूर्ण मतदार संघात शिरपुर पॅटर्न, लातुर पॅटर्नसारखे लहान मोठे बंधारे बांधून पाणी अडवण्यात येईल.

◆ संपूर्ण मतदार संघात छोट्या नद्या व नाल्यांची जोडणी करुन नियोजनबध्द आखणी करुन सिंचन क्षेत्र वाढविणेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु.

◆ गावातील असलेले जुने व नादुरुस्त बंधाऱ्यांना पुर्नजीवीत करुन पाण्याचा साठा वाढविणार.

◆ गावातील छोटे-मोठे नद्या आणि नाल्यांना रुंदीकरण, खोलीकरण व स्टेपिंग पॅटर्नस वापरुन पाण्याचा साठा व निचरा वाढवून बंद पडलेले कुपनलिका पुर्नजिवीत करण्यासाठी शासकीय व निमशासकीय स्तरावरुन आर्थिक सहाय्य करणार

◆ शेतकरी बांधवांना शेतीसाठी बांध, व्यक्तिगत शेततळे, सपाटीकरण, छोटे नाले रुंदीकरण इ. कामासाठी जि. प. गटनिहाय एक “जे.सी.बी.मशीन”देणार. • जानवे-लोटी बाडगी धरण बांधून पांझरा नदीवर बंधारा बांधून चारीद्वारे धरणात पाणी सोडणार.

◆ मुडी-मांडळ शिवारातील ब्रिटीशकालीन पाटाचे पुर्नजिवन करुन सर्व शिवारात पाणी पोहचवून पांझरा परिसर हिरवेगार करणार.

◆ पांझरा नदी – भाला नाला, लौकी नाला हे नदीजोड प्रकल्पाअंतर्गत जोडून जवखेडा, वावडे, मांडळ, मुडी, भरवस, लोण, एकलहरे, भिलाली या सर्व शिवारांचा पाणी प्रश्न सोडविणार. पारोळा तालुक्यातील जिराळी शिवारातील अपूर्ण असलेले “काटसरधरण”पूर्ण करणार.

आरोग्य.

 

¥ ग्रामिण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त करुन तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करुन योग्य ती साधन सामुग्री उपलब्ध करुन देण्यात येईल,

¥ संपूर्ण मतदार संघामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने मोफत आरोग्य शिबिरे घेऊन मुंबई-पुण्यातल्या नामांकित रुग्णालयांमध्ये मोफत उपचारासाठी सुविधा उपलब्ध करणार. मतदार संघासाठी अमळनेर शहरामध्ये किडणी रुग्णांसाठी ‘डायलिसीस सेंटर’ उभारणार.

¥ ‘गांव तेथे महिला व पुरुषशौचालय धोरण राबवून नामांकित सेवाभावी संस्थांकडून त्यांची पूर्ण निगा व स्वच्छता राखणार.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button