अमळनेर (प्रतिनिधी) शेतातील मका पिकावार फवारणी करताना विषबाधा झाल्याने रत्नापिंप्री येथील तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री येथील भगवान आधार पाटील (वय ४५) यांचे शेळावे रस्त्यावरील रत्नापिंप्री शिवारात शेत आहे. यात त्यांनी मका लावला आहे. या मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यासाठी ते आपल्या स्वतःच्या मालकीच्या शेतात मका या पिकावर दिल्लीगेट नावाचं कीटकनाशक फवारणी करत असताना औषधाची विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. औषधाची विषबाधा झाल्यानंतर त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा विषारी द्रव्य आणि मृत्यू झाल्याचे समोर आले असून या घटनेत या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांच्या पश्चात दोन मुले पत्नी असा परिवार आहे