अमळनेर( प्रतिनिधी ) येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेत गोपाळकाला निमित्ताने शाळेच्या बाल गोपिकांनी दहिहंडी फोडत गोविंदा रे गोपालाच्या गजरात एकच जल्लोष केला.
विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक कसरत करीत आनंदाने सामूहिक कार्य एकतेने करण्याची संघ भावना वाढीस लागण्याच्या उद्देशाने दहिहंडी सरस्वती विद्या मंदिर मध्ये दरवर्षी साजरी केली जाते. दहिहंडी फोडण्यापूर्वी ‘गोविंदा आला रे आला’ च्या गाण्यावर ठेका धरत विद्यार्थी विद्यार्थिनींनी नाचत एकच जल्लोष केला. गोपाळकाला साजरा करतांना दहिहंडी फोडण्यासाठी एकावर एक थर लावण्याचा प्रयत्न बाल गोपिका करत असतांना विद्यार्थी पाण्याचा मारा करीत.उंचावर टांगलेली दहिहंडी बाल गोपिकांनी दोन थर लावून हातात काठी घेऊन फोडली आणि गो गो गो…गोविंदा च्या गाण्यावर एकच जल्लोष केला. दहिहंडी उत्सवात शिक्षकांनीही विद्यार्थि व बाल गोपिकांसह नाचत आंनद व्यक्त केला.मुख्याध्यापक रणजित शिंदे,आनंदा पाटील,संगिता पाटील, गीतांजली पाटील,परशुराम गांगुर्डे,धर्मा धनगर,ऋषिकेश महाळपूरकर ,मदतनीस संध्या ढबु आदिंनी दहिहंडी उत्सव साजरा करण्यासाठी परिश्रम घेतले.