अमळनेर (प्रतिनिधी) माजी उपनगराध्यक्ष यांचे दुकान सव्वा महिन्यात दोनदा फोडून सुका मेव्यावर ताव मारून रोख रकमेसह दोन लाखांवर डल्ला मारणाऱ्या अट्टल घरफोड्याच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या.
माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांचे लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये स्वामी सुपर शॉप नावाचे दुकान आहे. हे दुकान गेल्या सव्वा महिण्यात प्रवीण रंणछोड पाटील रा बिडगाव ता चोपडा या चोरटय़ाने दोनदा फोडले. त्याने दुकानातील गल्ला आणि सी सी टी व्ही चे डी व्ही आर सह कॅमेरे , टी व्ही व दुकानातील सिगारेट चे खोके , काजू , बदाम , व रोख रक्कम असा एकूण 2 लाखाचा माल चोरून नेला. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले. त्यांनतर पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून 82 हजराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.