अमळनेरात लायन्स क्लब तर्फे उद्या हास्य योग् शिबिर ; हास्य योग प्रशिक्षकांची लाभणार उपस्थिती

अमळनेर (प्रतिनिधी) कुटुंबासाठी स्त्री-पुरुषाना लहान-सहान गोष्टीवर बोलताना हसले पाहिजे.तरच जीवन आनंटी बनेल व्यक्तीचे कार्यक्षेत्र कोणतेही असो ।
त्याच्या चेहऱ्यावर हास्य असावे. ” चेहऱ्यावर जर हस नसेल तर त्या दिवशी टुकान उघडू नये. “असे म्हटले जाते. आपण आनंदी असाल त्यावेळी जीवन आपल्या बरोबर हसत राहील. आपण दुसऱ्याला हसवाल त्यावेळी आयुष्यच आपणाला वंदन करेल. यावरून हास्य – योगाची गरिमा लक्षात येते. हे लक्षात घेऊन अमळनेर लायन्स क्लबने हसण्याचे फायदे काय व हास्य क्लब जागोजागी सुरू करण्यासंदर्भात एक मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे.
यापार्श्वभूमीवर अमळनेर लायन्स क्लबच्या वतीने हास्य योग् शिबिराचे आयोजन उद्या शनिवार दि 24 रोजी सायं 5 वा हनुमान रिसॉर्ट,अमळनेर येथे करण्यात आले आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य अरविंद सराफ माजी प्राचार्य, प्रताप महाविदयालय ,अमळनेर हे असून हास्य क्लबचे उद्घाटन सौ. डॉ. सुषमा दुग्गड(M.D.) प्रमुख प्रशिक्षिका, नासिक, माजी अध्यक्षा , महाराष्ट्र यांच्या हस्ते होणार आहे,यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राजेंद्र भंडारी ( Master Trainer , बेंगलोर) यांची राहणार आहे ‘तरी न भूतो न भविष्यति’ अशा कार्यक्रमास सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या उपक्रमास शिवाजी उदयान प्रभात हास्ययोग क्लब, अमळनेर महिला मंच, एव्हरग्रीन सिनिअर सिटीझन क्लब,सर्व शाळा, महाविदयालये , अमळनेर अध्यक्ष लायन्स क्लब अमळनेर यांचे सहकार्य लाभणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *