अमळनेर (प्रतिनिधी) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण व एच पी टी आणि आर वाय के महाविद्यालय आयोजित उत्तर महाराष्ट्र स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अमळनेर येथील युवा वक्ते, धुळे विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी सारांश धनंजय सोनार यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
मी आहे ऑन लाईन (सोशल मीडिया) या विषयावर आयोजित या वक्तृत्व स्पर्धेत उत्तर महाराष्ट्रातून 103 स्पर्धक सहभागी झाले होते. सारांश यांना 3000 रुपये रोख, चषक व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
सारांश सोनार यांचे या यशा बद्दल प्राचार्य विजय बहिरम, प्राचार्या ज्योती राणे, प्रा वैभव सबनीस, प्रा नितीन पाटील, प्रा रमेश माने, प्रा लीलाधर पाटील, प्रा संदीप नेरकर, प्रा पराग पाटील, डीगंबर महाले, डॉ जी एम पाटील, प्रा अशोक पवार, सतीश देशमुख, रवींद्र विसपुते, श्याम सोनार, लिलाचंद विसपुते, डीगंबर विसपुते, गणेश खरोटे, संजय सोनार शहर व तालुका पत्रकार मित्र, सुवर्णकार समाजाने अभिनंदन केले.
निकाल – श्रुष्टी बोरसे प्रथम, सारांश सोनार द्वितीय शुभांगी धोमसे तृतीय उत्तेजनार्थ- महिमा ठोंबरे, गायत्री वाघचुले