अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या युवासांसद कार्यक्रमनतर्गत युवा जागर वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यातून प्रताप महाविद्यालयाने बाजी मारली असून प्रथम क्रमांक हितेश कैलास पाटील याने तर द्वितीय सारिका झालटे हिने आणि तृतीय क्रमांक जययोगेश्वर महाविद्यालयाच्या पदमश्री पवार हिने मिळवला आहे
शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे शासनाच्या , स्वच्छ भारत अभियान ,जलयुक्त शिवार ,श्रमदान , उजवला गॅस योजना , जनधन योजना आदी लोकोपयोगी योजनांवर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या स्पर्धांचे उदघाटन आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्या ज्योती राणे , गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन , उपप्राचार्य पी आर भावसार , तालुका क्रीडा समनव्यक सुनील वाघ होते कनिष्ठ महाविद्यालयात विजयी 39 स्पर्धकांनी तालुका स्पर्धेत सहभाग घेतला होता विजयी स्पर्धकांना खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन प्रदीप अग्रवाल , गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन व प्रमुख अतिथीयांच्या हस्ते ट्रॉफी व रोख बक्षीस देण्यात आले परीक्षक म्हणून मराठी विभाग प्रमुख प्रा रमेश माने , माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील , राहुल पाटील यांनी काम पाहिले सूत्रसंचालन प्रा आर एम पारधी यांनी केले स्पर्धेसाठी क्रीडा समितीचे डी डी राजपूत , निलेश विसपुते ,प्रा गुलाले , प्रा तायडे,हेमंत पाटील यांचे सहकार्य लाभले