पाडळसे धरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मानले आभार.!

अमळनेर (प्रतिनिधी) येथील पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमळनेर येथे महाजनादेश यात्रेच्या आगमनाप्रसंगी हेडावे चौफुलीवर धरणासाठी १५०० कोटीच्या कर्ज घेण्यास मंजूरी दिल्याबद्दल आभार मानण्यात आले.
महाजनादेश यात्रेचे अमळनेरच्या पैलाड भागात हेडावे चौफुलीवर आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडीतूनच उपस्थित पदाधिकारींचे पुष्पगुच्छ स्वीकारले. समितीचे सुभाष चौधरींनी हातात हात देत मुख्यमंत्री यांचे आभार मानले. या वेळी जलसंपदामंत्री गिरीष महाजन मुख्यमंत्र्यांसोबत होते. समितीचे पदाधिकारी रणजित शिंदे , प्रशांत पाटील, सतीश काटे, श्याम पाटील आदिंसह माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, भाजप पदाधिकारी बजरंग अग्रवाल, लालचंद सैनानी आदिसह विविध संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर फरशी रोड येथील कार्यक्रम स्थळी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने मुख्यमंत्री व जलसंपदामंत्री यांच्यासह शासनाचे पाडळसरे धरणासाठी १५०० कोटीच्या कर्ज घेण्यास मंजुरी दिल्याबद्दल आभार मानणारे होर्डिंग उभे करण्यात आले होते.

पोलिसांची सैरभर नजर….

मुख्यमंत्री यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सकाळ पासूनच पाडळसरे धरण समितीच्या कार्यालयावर पोलिसांचा ससेमिरा लावण्यात आलेला होता. मुख्यमंत्री यांच्या मागिल दौऱ्यात जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेली निदर्शने लक्षात घेता पोलिसांनी यावेळी मोठी दक्षता बाळगून पदाधिकाऱ्यांना सैरभर नजर फिरवत होते. समितीचे सुभाष चौधरी हे हेडावे चौफुलीवर समितीचे कार्यकर्ते रणजित शिंदे, सतीश काटे, प्रशांत भदाणे यांच्यासह आले असता पोलिसांनी त्यानां काही निवेदन देणे, आंदोलन वैगेरे तर करत नाही ना ? अशी विचारपूस केली. तर समितीच्या वतीने शासनाने धरणासाठी १५०० कोटी रुपये कर्ज घेण्यास दिलेल्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानायचे आहे यासाठी पुष्पगुच्छ घेऊन उपस्थित आहोत, असे सांगितले.मात्र तरीही पोलिसानी जास्तीचे पोलीस हेडावे चौफुलिवर बोलावून घेतले. यावेळी मुख्यमंत्री यांचे आगमन होताच समितीचे पदाधिकारी यांनी खरच ना.फडणवीस यांची केवळ आभार मानल्याचे लक्षात येताच अखेर पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *