अमळनेर (प्रतिनिधी) निम्न तापी प्रकल्पाला १५०० कोटी रुपये मंजूर केले असल्यामुळे या भागात सिंचन वाढून शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी लवकरच निधू मिळवून देऊन धरणाचा प्रश्न आमचेच शासन पूर्ण करणार आहे, त्यामुळे तुमचा जनादेश घ्यायला आलो आहे, तुमचा जनादेश आहे का ? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागत सभेत केला. जनतेनेही मोठ्या आवाजात त्यांना प्रतिसाद दिला.
दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा अमळनेरात पोहचली. येथील फरशी पुलावर रमाबाई आंबेडकर चौकात सभेला सुरुवात झाली. वाहनावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी होते.
यात्रेचे आगमन होताच सिद्धार्थ व्यायाम शाळा लेझीम मंडळ,संत सखाराम महाराज वारकरी पाठशाळा यानीं भव्य स्वागत केले.आकर्षक रांगोळीने परिसर सजविण्यात आला होता. तर प्रचंड आतषबाजी देखील करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी व्हॅनवरून जनतेस अभिवादन केले. आपल्या १० मिनिटांच्या मनोगतात त्यांनी जनतेची मने जिंकली,पाच वर्षांपूर्वी छत्रपती शिवराय आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने हे सरकार विराजमान झाल्यानंतर दिन,दलित,ओबीसी, मराठा, हिंदु,मुस्लिम सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. विकासाचा आलेख उंचावताना २० हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग,१० हजार किमीचे राज्यमार्ग,सुमारे १८ हजार गावांमध्ये पाणीपुरवठा योजना,सिंचन योजना राबवून हे राज्य खऱ्या अर्थाने सुजलाम सुजलाम करण्याचा प्रयत्न केला,अरबी समुद्रात छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांचे स्मारक उभारण्याची किमया याच सरकारने करून दाखविली,अजून भरपूर काही करायचे असून त्यासाठी आशीर्वाद घ्यायला आलो आहे,तुमचा दिलेला आशीर्वाद हाच जनादेश समजून जात असल्याचे मुख्यमत्र्यांनी सांगितले. मु्ख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जे पंधरा वर्षात आघाडी सरकारने केले नाही, ते भाजपाने साडेचार ते पाच वर्षात वर्षात केले. विशेष म्हणजे आम्ही दुप्पट कामे करून दाखवली . दिनदलीत, सर्व समाजातील विकासासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असून आज जलयुक्त शिवार मार्गाने पाण्याचा प्रश्न सुटत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी माजी आमदार साहेबराव पाटील,डॉ.बी.एस.पाटील,नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ, बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पवार, भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब जीवन पाटील, श्याम अहिरे, रामभाऊ सांदनशिव, संचालक, पंचायत समितीचे सदस्य भिकेश पाटील, प.स.सभापती वाजबाई भिल,कु.उ.बा उपसभापती अॅड. श्रावण ब्रमहें, उपनगराध्यक्ष बिरजू लांबोळे, दलीत नेते रामभाऊ संदानशिव, दूध संघ उपसभापती महेंद्र महाजन, महेश पाटील, शहर अध्यक्ष शीतल देशमुख, जिजाब पाटील, हिरालाल पाटील, उमेश वाल्हे, दिलीप ठाकूर, सर्व नगरसेवक, जि .प. सदस्य मीनाताई पाटील, संगीत भिल, सोनुबाई भिल, प. स. सदस्य रेखाताई पाटील, कविताताई पाटील, भिकेश पाटील, विनोद पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख राजेंद्र पिंगळे, तालुका अध्यक्ष विजय पाटील, भूत बापू सर्व शिवसेना कार्यकर्ते, आरपीआय तालुका अध्यक्ष यशवंत बैसाने व पदाधिकारी, माजी जि. प सदस्य संदीप पाटील, ए. टी. पाटील, महेंद्र बोरसे, राहुल पाटील, सदाशिव पाटील, महेश पाटील, महेश देशमुख आणि अमळनेर तालुक्यातील हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी सोपवला….
मुख्यमंत्री मदत निधीसाठी, आमदार स्मिता वाघ यांनी १ लाख ११ हजार, माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी ५० हजार, अमळनेर फोटोग्राफर असोसिएशन ११ हजार १११ ,अमळनेर टॅक्सी युनियन ११ हजार, कविता चेतन जाधव यांनी ५ हजार याप्रमाणे मदत जाहीर करून मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या वेळी मार्केटचे उपसभापती अॅड एस एस ब्रह्मे,माजी सभापती शाम अहिरे, नगरसेविका सौ नूतन पाटील, महेंद्र पाटील, शेखा मिस्तरी, विक्रांत पाटील, सुरेश पाटील, नाटेश्वर पाटील, महेश पाटील, उमेश वाल्हे,महेंद्र महाजन, संदीप पाटील, जिजाब पाटील, दिलीप ठाकूर,राजेंद्र यादव,निशांत अग्रवाल, दिलीप ठाकूर, निवास मोरे,राजेश वाघ,राहुल पाटील, प्रकाश पाटील, एम डी चौधरी,जुलाल पाटील, चंद्रकांत कंखरे, दीपक पाटील, चेतन जाधव,कविता जाधव,सौ माधुरी पाटील, प स सदस्य कविता पाटील, विनोद जाधव यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले.