अमळनेर (प्रतिनिधी)येथील बस स्थानकावर विद्यार्थ्यांचे बस पाससाठी प्रचंड हाल होत असल्याने हा त्रास थांबविण्यासाठी तात्काळ दुसरी (अतिरीक्त)खिडकी सुरु करावी या मागणीसाठी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांनी आगार प्रमुखांची भेट घेऊन निवेदन दिले,यावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन आगारप्रमुख सौ अर्चना भदाणे यांनी दिले.
सदर निवेदनात नमूद केले आहे की अमळनेर बस स्थानकावर विद्यार्थी पास व जेष्ठ नागरीकांचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी एकच खिडकी असल्याने विद्यार्थ्यांना तासनतास रांगेत ताटकळत ऊभे रहावे लागते.परिणामी ते शाळा महाविद्यालयात अनुपस्थित राहत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून दररोज वादविवादाचे प्रकार देखील घडत आहेत. तरी हे प्रकार थांबविण्यासाठी बस स्थानकावर विद्यार्थी पास वितरणासाठी तात्काळ दुसरी अतिरीक्त खिडकी सुरु करुन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी विनंती यावेळी करण्यात आली,यावर वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन आगरप्रमुख सौ भदाणे यांनी दिल्याने पत्रकार बांधवांनी त्यांचे आभार व्यक्त केले.यावेळी स्थानक प्रमुख श्री चौधरी देखील उपस्थित होते.
सदर निवेदन देण्यासाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतनं राजपुत,उपाध्यक्ष जितेंद्र ठाकुर,सचिव चंद्रकांत पाटील,संजय पाटील,उमेश काटे,भटेश्वर वाणी,मुन्ना शेख,जितेंद्र पाटील,ईश्वर महाजन,जयेश काटे,सचिन चव्हाण,आबीद शेख,गौतम बिऱ्हाडे,महेंद्र पाटील,यासह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते