सत्याचा नेहमी वाजवून डंका, बेईमानांचा फाडला बुरखा म्हणूनच वर्षभरात ‘खबरीलाल’झाला वाचकांचा लाडका

वर्षपूर्तीनिमित्त आमच्या वाचकांचे शतशः आभार

अत्यंत कमी कमी कालावधीत मिळालेले यश व वाचकांनी दिलेली दाद आमचा विश्वास वाढवणारी आहे. आपल्या नेहमी मिळणाऱ्या सदिच्छा, लाईक्स व मिळणारे पाठबळ आठवणीत ठेऊन न्याय मिळवून देताना सत्याचा वसा टाकणार नाही, केवळ एका वर्षाभरात लाखो वाचकांनी आमच्या खबरीलाल वेबसाईट ला भेटी दिल्या व हे मिळालेले यश आमच्या वाचक रसिक बंधूंच्या चरणी आम्ही अर्पण करीत आहोत. आपले प्रेम काय असेच वृद्धींगत राहतील, या अपेक्षा आहेत.

 

संत सखाराम महाराजाच्या आशीर्वादाने आणि साने गुरूजी यांच्या कर्मभूमीने पावन झालेल्या अमळनेर सारख्या छोट्या तालुक्याच्या ठिकाणी २२ ऑगस्ट २०१८ रोजी ‘खबरीलाल’न्यूज पोर्टलची मुहूर्तमेढ रोवली. बघता बघता एक वर्षाचा कालावधी सर्रकन निघून गेला. वर्षभर अखंडपणे प्रामाणिकपणाने शहरासह परिसरातील घडामोडींचा वृत्तांत आहे, तसाच वाचकांसमोर मांडल्याने ते त्यांना भावले. म्हणूनच ‘खबरीलाल’ एक वर्षाचा यशस्वी पल्ला गाठू शकला. लोकशाहीचा चौथा खांब म्हणून नेहमीच आमची जागल्याची भूमिका राहिली आहे. म्हणूनच समाजात घडणाऱ्या चांगल्या, वाईट घटनांचा धांदोळा घेत सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ‘भले तरी देवू कासेची लंगोटी। नाठाळाच्या माथी हाणू काठी।’ अशीच आमची भूमिका राहिली आहे. तर ‘सज्जनांचा सत्कार, दांभिकांचा धिक्कार’ करत त्यांचा पडदाफाश केला आहे. म्हणूनच आम्ही ईमाने, इतबारे पत्रकारीता करीत सत्याचा नेहमीच डंका वाजवत, बेईमानांचा बुरखा फाडला असल्याने वर्षभरात ‘खबरीलाल’वाचकांचा लाडका झाला आहे.
अनेकांनी स्वतः भेटून, कॉल, मेसेज, व्हॉट्सअॅपवरून भरभरून कौतुक केले आहे. खरे तर ते आपल्या वाचकांच्या पाठबळामुळेच शक्य झाले आहे.
मित्रांनो, आपला उदंड प्रतिसाद आणि सदिच्छांमुळेच आज खबरीलालने यशस्वीरित्या एक वर्ष पूर्ण केले. प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रानिक मीडियाच्या जीवनघेण्यात स्पर्धेतही खबरीलालने आपले वेगळेपण सिद्ध करून वाचकांच्या मनावर गारूड केले आहे. आपल्याला कोणाचेही लेबल लावून चौकटीत राहत पत्रकारिता जमत नसल्याने अनेकांना ते रुचत नाही, पटत नाही आणि खटतेही, पण वाचकांना आपला हाच गुण भावतो. आपली प्रामाणिकता ही वाचकांशी असल्याने यापुढेही अशीच आपली पत्रकारिता बहरत राहणार आहे. म्हणून वाचकांना जे सत्य आहे ते सांगून कौतुक करणे आणि आणि जे असत्य आहे ते उघडे नागडे करून मांडणीची हातोटी असल्याने ‘खबरीलाल’ एक वर्षात वाचकांचे आवडते पोर्टल झाले आहे. खरे तर आपण ‘खबरीलाल’वर दाखवलेल्या विश्वासामुळेच आजपर्यंतची यशस्वी वाटचाल खंबीर साथीने पार करू शकलो. अमळनेर सारख्या छोट्या तालुक्याच्या ठिकाणी खबरीलालची मुहूर्तमेढ रोवली असली तरी आपल्या साथीने आणि सहकार्य, सदिच्छांनी त्याचा भविष्यात अधिक विस्तार करणार आहोत. अमळनेर शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक कान्याकोपऱ्यातील बित्तंम बातमी तुम्हाला मिळावी, एेवढेच नव्हे तर हळूहळू राज्य, देश, अंतरराष्ट्रीय पातळवरील सर्व घडामोडीही देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. या घडामोडी देतानाही पत्रकरितेशी आणि वाचकांशी कधीही तडजोड केली जाणार नाही. म्हणूनच अत्यंत कमी कमी कालावधीत मिळालेले यश व वाचकांनी दिलेली दाद आमचा विश्वास वाढवणारी आहे. आपल्या नेहमी मिळणाऱ्या सदिच्छा, लाईक्स व मिळणारे पाठबळ आठवणीत ठेऊन न्याय मिळवून देताना सत्याचा वसा टाकणार नाही, केवळ एका वर्षाभरात लाखो वाचकांनी आमच्या खबरीलाल वेबसाईट ला भेटी दिल्या व हे मिळालेले यश आमच्या वाचक रसिक बंधूंच्या चरणी आम्ही अर्पण करीत आहोत. आपण केव्हाही, कोणताही विषय द्या, बातमी द्या, काही नवीन सूचवा, नेहमी आपले स्वागत आहे. आपण ‘खबरीलाल’वर प्रेम करीत आहात, यापुढेही करीत राहला याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि कायम आपल्या ऋणात राहू इच्छितो, सदैव सत्या सोबत !
– आणि हो… ‘खबरीलाल’च्या बातम्या अपडेट्स व्हॉट्सअॅपमध्ये मिळवण्याकरीता आपल्या मोबाइलवर आलेल्या लिंकवर क्लिक करा https://www.khabrilalnews.online/p/blog-page.html   आणि खबरीलाल ला जॉईन व्हा.. आणि plz वरील संदेश-लिंकही शेअर करा.

                    धन्यवाद……
आपला
जितेंद्र ठाकूर
मुख्य संपादक, खबरीलाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *