अमळनेर(प्रतिनिधी) बेरोजगारी आणि उसनवारीच्या झालेल्या कर्जामुळे श्रीराम कॉलनीतील रहिवाश्याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अमळनेर येथील वाघ बिल्डिंग परिसरातील श्रीराम कॉलनीतील रहिवासी जितेंद्र चिमणराव महाजन वय ४५ यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून कुर्हे ता अमळनेर शिवारात आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
मयत जितेंद्र यांनी मी कायमस्वरूपी असणाऱ्या बेरोजगारी मुळे आत्महत्या करीत असून यास कोणालाही जबाबदार धरू नये तसेच माझ्या पत्नीने माझी वृद्ध आई व मुलांचा व्यवस्थित सांभाळ करावा तसेच ज्या लोकांकडून मी उसनवारी व कर्ज्याचे पैसे घेतले आहेत त्यांनी माझ्या कुटुंबाकडून पैश्याची मागणी करू नये असे आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिट्ठीत म्हटले आहे जितेंद्र महाजन यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे त्यांची अंत्ययात्रा २१ रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरून श्रीराम कॉलनी येथून निघणार आहे.