खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

लोंढवे येथे अटलबिहारी वाजपेयींना अभिवादन, भाजपाच्या मतदार नोंदणी अभियानास सुरुवात

अमळनेर (प्रतिनिधी)- अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांन प्रथम पुण्यतिथिनीमित्त अभिवादन करून नवमतदार नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली.
भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी गोबाजी पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब जीवन पाटील यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी मनोगत
व्यक्त केले. ते म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी हे कुशल संघटक, कवी, स्पष्टवक्ता, उत्कृष्ट मार्गदर्शक होते. तसेच त्यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. या वेळी शक्तिकेंद्राचे प्रमुख नथ्थू पंढरीनाथ पाटील निसर्डी तसेच लोंढवे येथील जि.प.सदस्य पती राजू पवार, उपसरपंच ज्ञानेश्वर पवार, ग्रामपंचायत सदस्य नामदेव पाटील, लखीचंद पाटील, नाना खैरनार, मच्छिंद्र पाटील, अनिल पाटील तसेच माजी उपसरपंच शांताराम पाटील, प्रोफेसर भागवत, गावातील गोपीचंद पाटील, रावसाहेब पाटील, दगडू पाटील, माजी सरपंच कैलास पाटील, प्रकाश आण्णा, महादू पाटील, बुधा खैरनार, सुभाष खैरनार, पंडित पाटील, भटू पाटील, अशोक पाटील, सोनू पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दीपक पाटील, जिजाबराव पाटील, संजय पाटील आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button