खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

अॅड ललिता पाटील यांनी निभावली पोलीस बांधवांप्रती बहिणीची भुमिका…!

अमळनेर-सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ह्या वाक्या प्रमाणे वर्षभर आपल्याला संरक्षण देण्यासाठी दिवस रात्र एक करुन नागरिकांना विवीध सन उत्सव आनंदात साजरा करता यावेत यासाठी आपल्या कुटुंबाबरोबर न रहाता आपल्या संरक्षणासाठी सदैव तत्पर व कटिबद्ध असणार्या पोलीस बांधवांचे आपल्या सामाजिक जिवनात फार मोलाचे योगदान असते.पोलीस बांधवांना नागरीकांकडुन मिळणारे प्रेम व कौतुकाची थाप त्यांच्यासाठी फार मोठे बक्षिस असते.
यासाठी पोलीस बांधवांना नोकरी व बंदोबस्त यामुळे सनाच्या दिवशी कुटुंबापासून लांब रहावे लागते म्हणुनच अमळनेर येथील फिनिक्स सोशल अवेरनेस गृपतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून अमळनेर पोलीस स्टेशनला रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरी होत असतो.सालाबादाप्रमाणे ह्यावर्षी गृपच्या अध्यक्षा अॅड ललिता पाटील यांसह वसुंधरा लांडगे,अनिता पाटील,प्रतिभा मराठे,भारती पाटील,सुचिता पाटील,विद्या हजारे,संगिता पाटील,मंजुषा पाटील,देवेश्री पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनमधे जाऊन पोलीस निरीक्षक अंबादास मोरे आणि सर्व पोलीस बांधवांचे औक्षण करुन राखी बांधत रक्षाबंधन साजरी करण्यात आले.यावेळी गृपमधील बहीणींच्या मायेने पोलीस बांधव भारावले व एक वेगळा आनंद त्यांच्या चेहर्यावर यावेळी पहायला मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button