खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलचा 14 वर्षीय मुलींचा गट तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर क्रीडा संकुल येथे आयोजित कबड्डी स्पर्धेत पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलचा 14 वर्ष वयोगट मुलींचा संघ हा विजेता ठरला आहे. सदर स्पर्धा दिनांक 14 /8 /2019 बुधवार या दिवशी आयोजित करण्यात आली होती. नामांकित संघांना नमवित व उत्कंठावर्धक आणि रोमहर्षक स्वरूपात विजयश्री ओढून आणली. अंतिम सामना अतिशय चुरशीच्या पद्धतीने लढला गेला. अटीतटीच्या सामन्यात आपले सर्व कसब व कौशल्य लावून शाळेच्या विद्यार्थिनींनी विजय प्राप्त केला. सदर संघास अनमोल मार्गदर्शन शाळेचे क्रीडाशिक्षक श्री. महेश माळी व सौ सादिका शेख मॅडम यांचे लाभले. विजयी संघातील सहभागी मुली खेळाडू कु. यशोदा पाटील (कॅप्टन), कु.अनिता जाधव, विजया मोरे ,सुचिता यादव ,सोनाली लोहार ,आर्या अवनकर, देवयानी पाटील, सृष्टी बोरोले, दिशा सपकाळे हे या संघाचे प्रमुख आधारस्तंभ ठरले. या गौरवास्पद विजयाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक श्री.जे.एस. देवरे, पर्यवेक्षिका सौ.व्हि.पी. बडवे, श्री. प्रशांत मालुसरे, श्री. प्रशांत वंजारी समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button