अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात आता पुरानंतर शेती करणे देखील मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून या नुकसानग्रस्त भागाची पाहणी येथील जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे तहसीलदार ज्योती देवरे यांनी शनिवारी पातोंडा सावखेडा भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले यावेळी जिल्हाधिकारी व तहसीलदारांनी पाहणी केली असता तालुक्यातील पातोंडा, मटगव्हाण, जळोद, गंगापुरी, खापरखेडा, नालखेडा, दापोरी खुर्द, मुंगसे, रुंधाटी, सावखेडा येथील १०० टक्के पिके पाण्याखाली आली असून पंचनामे सुरू आहेत तर काही अंशी बाधित असलेले गावे दापोरी बुद्रुक धावडे कामतवाडी, खेडी, खवशी, पिळोदे, पिंपळी, बोहरे, कळमसरे, पाडसे, निम आदी गावातील पिके पावसाच्या व पुराच्या पाण्याखाली आलेली आहेत तालुक्यातील तब्बल ४२ हजार एकर जमीन ही पाण्याखाली बुडाली असून पिके पिवळी पडली आहेत.