अमळनेर (थेट पुण्याहून )पुण्यातील बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रिडा संकुलात पाणी फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ मधील विजेत्यांना पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.या सोहळ्यात अमळनेर तालुक्यातील अनोरे गावाने राज्यस्तरीय तृतिय पारितोषिक पटकावले.अनोरे गावच्या भगिरथांचा गौरव यावेळी करण्यात आला.
प्रथम पारितोषिक सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सुर्डी या गावाला ७५ लक्ष रुपयांचा धनादेश आणि वॉटर कप देण्यात आला.द्वितीय पिंपरी जलसेन ता. पारनेर,जि.सातारा ता. माण शिंदी खु. यांना प्रत्येकी २५००००० विभागून देण्यात आले.तर तृतीय पारितोषिक जळगांव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अनोरे या गावाला तसेच ,बीड जिल्ह्यातील देवऱ्याची वाडी,वाशिम जिल्ह्यातील बोरव्हा बु. या गावाला प्रत्येकी १३,३५००० रुपये विभागून जाहिर करण्यात आले.
अमळनेर वॉटरकप स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम अनोरे १० लक्ष रु.द्वितीय निंम ६ लक्ष रु,तृतीय दहिवद ४ लक्ष रु. यावेळी जाहीर करण्यात आले.यावेळी पारितोषिक घेण्यासाठी संदिप पाटील,तुकाराम पाटिल,बाजीराव पाटील नरेंद्र पाटील, सुनीता पाटील,अंबू पाटिल, साहेबराव पाटील, रायचंद पाटील,शांताराम पाटील,विजय पाटील आदिंनी मंचावर जाऊन पारितोषिक व धनादेश स्वीकारला.यावेळी पत्रकार संजय पाटिल, जितेंद्र ठाकूर,सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांचेसह अनोरे गावचे ग्रामस्थ,महिला,तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिनेकलावंत व दिग्गजांची उपस्थिती….
यावेळी मंचावर पुरस्कार देण्यासाठी अभिनेता आमिर खान,किरण राव,पाणी फाउंडेशन चे सत्यजित भटकळ, मुख्यमंत्री यांचे कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे,पोपटराव पवार, प्रवीण परदेशी,अजय पिरामल, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, डॉ. अविनाथ पोळ,सैराट चे दिग्दर्शक नागराज मंजुळे,संगीतकार अजय-अतुल,अभिनेत्री सई ताम्हणकर, चला हवा येऊ द्या साज कलाकार भाऊ कदम, भारत गणेशपुरे,सागर कारंडे,श्रेया बुगडे, अभिनेता गिरीश कुलकर्णी, फुलवा खामकर, राजीव लुथ्रा,यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेले असंख्य गावकरी उपस्थित होते.
सुप्रसिद्ध अभिनेताआमीर खान आणि किरण राव यांच्या ‘पानी फाऊंडेशन’ या संस्थेने ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमाच्या कोअर टीमसह केवळ लोकचळवळीतूनच पाणी टंचाईवर मात करता येऊ शकते हा विचार घेऊन या पाण्याचे कार्य सुरु केले.लोकांना जागृत, आणि प्रशिक्षित करून प्रोत्साहन दिले तर अतिशय बिकट झालेला पाणीप्रश्न सोडवण्याची क्षमता आणि जिद्द ,कुवत गावांत निर्माण होईल हे लक्षात घेऊन ‘पानी फाऊंडेशन’ने लोकांना जलसंधारणाचे विज्ञान शिकवण्यासाठी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी ४७८८ गावच्या खास प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी केली. पैकी ४१५३ गावांनी यशस्वी सहभाग घेत काम पूर्ण केले.यातील विजेता गावांना ‘पानी फाऊंडेशन’ तर्फे दरवर्षी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेच्या माध्यमातून वॉटर कप दिला जातो.