खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

संस्था बुडवणाऱ्या चौधरींचे मुनसुबेही पाडळसेत बुडाले; म्हणूच आमदार स्मिता वाघांवर करताय बिनबुडाचे आरोप!

आमदारांची खाजगी सुपारी घेतल्याची चौधरी अण्णांवर भाजपेयींची आगपाखड.

अमळनेर(प्रतिनिधी) नगरपालिका, कापूस फेडरेशन, हेडगेवार पतसंस्था,वर्णेश्वर संस्थान व पपईबाग येथे गैरव्यवहार करून संस्था बुडवणाऱ्या सुभाष चौधरींचा इतिहास सर्वांना माहिती आहे. या सर्व संस्था डबघाईला आणल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पाडळसे धरणाकडे वळवला होता, अनेक वर्षे हे आंदोलन चालेलं असेच यांचे मनसुबे होते. मात्र कल्याणकारी भाजप सरकारने 1500 कोटी निधीस मंजुरी देऊन यांच्या मन्सूब्यावर पाणी फिरवले असल्याने मंजुरीसाठी प्रयत्न करणाऱ्या आमदार स्मिता ताईवर ते आगपखड करीत असल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

पत्रकांवर पत्रक…..

पाडळसरे धरणासाठी भाजप सरकारने 1500 कोटी निधीची तरतूद केल्यानंतर आ स्मिता वाघ यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांचे वृत्तपत्राद्वारे आभार मानल्यानंतर सुभाष चौधरी यांच्या पोटात दुखल्याने त्यांनी पाडळसरे जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांची दिशाभूल करून आ. स्मिता ताई यांची बदनामी करणारे पत्रक वृत्तपत्राद्वारे प्रसिद्धीस दिले.या पत्रातील मुद्यावर भाजप कार्यकर्त्यांनी चौधरी यांच्यावर पलटवार करताना म्हटले आहे की पाडळसरे धरणासाठी आ स्मिताताईचे सुरवातीपासून प्रयत्न सुरू असताना ग्रामिण भागातील काही शेतकरी पुत्रांनी एकसंघ होत गावोगावी प्रबोधन करुन धरणासाठी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला,हळूहळू यास जनतेचा प्रतिसाद मिळू लागल्याने याचे रूपांतर जनआंदोलनात झाले.प्रत्यक्षात त्यात कोणतेही राजकारण नसल्याने सर्व स्तरातन त्यांना प्रतिसाद मिळत होता.मात्र कालांतराने हे आंदोलन आपल्या मर्जितले होण्यासाठी आमदारांच्या इशाऱ्याने चौधरी यांची एंट्री झाली. सुरवातीपासून भुलभुलेय्या करण्यात ते माहीर असल्याने प्रमुख पद पदरात पाडून घेतले.मात्र काही दिवसांतच त्यांचे राजकीय आणि स्वार्थी रंग पाहून अनेक प्रामाणिक कार्यकर्ते आंदोलनातून दुरावले.दुरावले म्हणण्यापेक्षा यांनीही सोईस्कर दूर केले यामुळे राहिलेल्या कार्यकर्त्यांना पूर्णपणे हाताशी धरून आमदारांच्या मर्जीनुसारच हे आंदोलन होत गेले,आणि प्रत्येक वेळी आ स्मिता ताईना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला,आंदोलनकर्त्यांना “भिक माँगो वाले” म्हटल्याचा अतिशय खोटारडा आरोप त्यांनी केला. प्रत्यक्षात असे कुठेही घडलेले नाही.तसेच धरणासाठी काढलेल्या जनतेच्या मोर्चात स्मिता ताईंनी सहभागी होऊन जलसपदा मंत्री गिरीश महाजन यांचेशी जनतेसमक्ष बोलणे करून दिले.त्याचे देखील त्यांनी भांडवल करून आमदार ताईची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तहसील कार्यालयाजवळ साखळी उपोषणात प्रत्येक दिवशी अण्णांच्या भाषणात केवळ स्मिता ताईवरच चिखलफेक होत होती, प्रत्यक्षात या ठिकाणी जो मंडप टाकला होता त्याचे बिल मोठया प्रमाणात नंदुरबारहुन वसूल झाले.तेथेही यांनी सामता सत्याना अधारात ठेऊन उर्वरित बिल खिशात टाकले,माजी आ.वाटा आंदोलनात सक्रिय असल्याने ते देखील त्यांना खटकत असल्याने दररोज त्यांनाबाहेर काढण्याचा गोपनीय प्रयत्न होत होता,कारण तबाहर न गेल्यास नंदरबार करांकडन मंडपाचे पैसे मिळणारनाहीत अशी तंबी त्यांना होती.अखेर कृषिभूषण हलत नसल्याने हे आंदोलन गुंडाळण्यात आले होते.आ स्मिता ताई या भाजपच्या अधिकृत आमदार असून अखेर भाजपा सरकारने या धरणास न्याय देण्याचे धोरण आखल्याने स्मिता ताईचे व भाजपा सरकारचे सर्वत्र आभार व्यक्त होत आहेत मात्र विधानसभानिवडणक तोंडावर असल्याने आमदारांच्याच इशाऱ्याने चौधरी अण्णांना पुन्हा मोकाट सोडण्यात आले असूनत्याअनुषंगानेच त्यांनी पत्रकबाजीचे नाट्य उभे करून महिला लोकप्रतिनिधीची बदनामी सुरू केली आहे,स्मिता ताई भाजपच्या व भाजप स्मिताताईचे असे हे घट्ट समीकरण असल्याने धारणाचे श्रेय त्या घेतही असतील तर त्यात कोणाला वाईटवाटण्याचे कारण नसून या धरणासाठी त्यांनी किती व कसा पाठपुरावा केला याचे साक्षीदार आम्ही असून त्याचेपुरावे देखील योग्य वेळी जनता जनार्दनाच्या दरबारात नक्कीच सादर होतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त करत,धरणासाठी टार्गेट करायला स्मिता ताई मग मंजुरी आल्यानंतर त्यांना श्रेय का नको?असा सवाल यात उपस्थित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button