बेडर शिक्षण विभाग आणि सीईटी सेल खेळतोय विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ

अमळनेर(प्रतिनिधी) पूरग्रस्त भागात विद्यार्थी कसे जाणार शिक्षण विभाग व सीईटी सेल तर्फे गेल्या महिन्यात डिप्लोमा इन फार्मसी व डिप्लोमा इन इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांसाठी डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी व इंजीनियरिंग डिग्रीसाठी ऍडमिशन प्रोसेस सुरू केली होती, त्यात पहिल्यांदा ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट वरून घातलेल्या घोळा नंतर आता आणखी एक नवीन प्रकरण समोर येत आहे.
सध्या फार्मसी कॅप राऊंड वन ची कॉलेज अलॉटमेंट झालेली आहे व ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे कॉलेज भेटलेले आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेण्यासाठी केवळ दोन दिवसांची मुदत दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना कोल्हापूर, सातारा, सांगली, अशा पूरग्रस्त विभागातील कॉलेज भेटलेले आहेत त्या कॉलेज पर्यंत पोहोचण्यास अडचण होत आहे परंतु झोपलेला शिक्षण विभाग व सुस्त सीईटी सेल याकडे बिलकुल लक्ष द्यायला तयार नाही आधीच डिप्लोमा नंतर डिग्री साठी ॲडमिशन घेण्यासाठी जागा कमी असतात व त्यात हातचे भेटलेले कॉलेज गमावण्याची वेळ या विद्यार्थ्यावर आलेली आहे तरी सीईटी विभागानी या प्रकरणाकडे गंभीर लक्ष देऊन मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत निराशेची बाब असून कृपया प्रशासन व शिक्षण विभागाने याकडे गंभीर लक्ष द्यावे अन्यथा विद्यार्थ्यांवर आत्महत्या करायची वेळ येईल. यासाठी राज्य सामाईक परीक्षा विभाग आयुक्तांशी उद्या निवेदन देऊन चर्चा करनार व मुलाना न्याय मिळुन देणार असल्याचे भूषण संजय भदाने (अध्यक्ष फार्मसी स्टूडेंट कौन्सिल महाराष्ट्र)8975851440 यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *