अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील पूरग्रस्त भागात अन्नदान व अनुषंगिक मदत करत मंगळ ग्रह सेवा संस्थेने तहसीलदार सौ. ज्योती देवरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वप्रथम धाव घेतली. अवघ्या दोन तासात
1200 ते 1500 पुरग्रस्ताना भोजन देण्यात आले. एक धार्मिक संस्था केवळ देव धर्म धरून न बसता विविध सामाजिक कार्यात ठोस पुढाकार घेत नवा आदर्श निर्माण करीत आहे ही दिशादर्शक बाब आहे.
विशेष म्हणजे खऱ्या गरजू पर्यंत मंदिर व्यवस्थापन पोचत आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत, वृक्ष संवर्धन, प्राणीमात्र व मूक प्राण्यांना मदत, शेतकरी कामकरी यांनां मार्गदर्शन व मदत , गरिबी व गरजू लोकांना कापड वाटप, शाल, ब्लॅंकेट वाटप, या सारख्या अनेक उपक्रमात मंदिर सदैव पुढाकार घेत आहे,पांझरा काठावर मंदिराचे विश्वस्त व सेवेकरी रात्रभर थांबून प्रत्येकाला मदत करताना धीर देत होते, ही मोहीम सुरूच राहील असे सांगण्यात आले आहे
राजू महाले यांचे मार्गदर्शना खाली बावीसकर सर, बापू अहिरराव येस येन पाटील , गिरीष कुलकर्णी , दिलीप बहिरम आदी सर्व पदाधिकारी व सेवेकरी या मानवता वादी कार्यात परिश्रम घेत होते सर्वांच्या या कामाचे दीर्घकाळ स्मरण राहील. शुभेच्छा व अभिनंदन -निर्भय व सारांश धनंजय सोनार