अमळनेर (प्रतिनिधी) जोरदार पावसामुळे चिखलात फसलेल्या मोराला बाहेर काढून त्याच्यावर उपचार करून मंगरूळ येथील शेतकऱ्याने त्याचे प्राण वाचवले आणि वनविभागाच्या ताब्यात दिले
तालुक्यातील मंगरूळ येथील अंबर नाईक हे पावसामुळे शेताची काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी 10 रोजी सकाळी शेतात गेले असता त्यांना चिखलात फासलेला एक मोर उडण्याचा प्रयत्न करताना दिसला मात्र त्याला उडता येत नव्हते अंबर नाईक यांनी त्याला बाहेर काढून घरी आणले त्यांनी शिक्षक राजेंद्र पाटील व संजय पाटील यांना बोलावले मोराच्या अंगावरचा चिखल धुवून त्याला पुन्हा शेतात सोडायला गेले असता मोराला उडता येत नव्हते त्याचे पंख , पाय सुजले होते किरकोळ जखमा झाल्या होत्या त्याला तसेच सोडले असते तर वन्य प्राण्यांनी त्याला मारून टाकले असते म्हणून अंबर नाईक यांनी मोराला अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयात आणले तेथून शिक्षक संजय पाटील यांनी त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले डॉ.यांनी उपचार केले त्यांनंतर वनरक्षक प्रवीण पाटील यांना बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आले शेतकऱ्याच्या भूतदयेबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.