अमळनेर( प्रतिनिधी) अमळनेर नगरपरिषदेचे भंगार चोरीचा प्रकार उघडीस आला आहे. यात एक कमर्चारी आणि एक उपमुख्याधिकारी दर्जाचा अधिकारी अडकल्याचा संशय बळावला असून तसे धागेदोरीही पोलिसांच्या हाती आले आहेत. त्यामुळे हे भंगार चोरीप्रकरण चांगलेच गाजणार असून संबंधित सर्वांनाच त्याचे उत्तरे द्यावी लागणार आहे. हे प्रकरण अंगलट येऊ लागल्याने आता नगरपालिकेच्या वरिष्ठांकडून सारवासारव करण्यात येत आहे.
नगरपालिकेच्या मालिकीचे ६० ते ७० हजार रुपये किमतीचे भंगार चोरीस गेल्याचा प्रकार उघडीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत नगरपालिकेने पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र दिले आहे. पोलिसांनीही तपास चक्रे फिरवून भंगारबाजार पिंजून नगरपालिकेच्या भंगाराचा शोध घेतला आहे. या भंगारवाल्याने पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्याने पोपटासारखी पटापट माहिती दिली. त्याने दिलेल्या माहितीने पोलिसही चक्रावून गेले. कारण हे भंगार नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याने विकल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी लगेच त्या कर्मचाऱ्याला लवकरच बोलवून चौकशी केली जाणार आहे. तर एेवढे ६० ते ७० हजाराचे भंगार विकण्याची डेरिंग एकटा कर्मचारी करणार नाही, त्यामुळे त्याच्या पाठीवर कोणाचातरी वरद हस्त असल्याचा संशय आम जनतेने ही व्यक्त केला आहे. तर काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नाव न सांगण्याच्या अटीवर उपमुख्याधिकारी यांच्याकडे संशयाची सुई नेली जात आहेत. त्यामुळे हे भंगारचोरी प्रकरण अधिकारी विरुद्ध कर्मचारी असे चांगलेच तापले असून कुंपनच शेत खाल्याचा प्रकार यातून समोर आला आहे.
आरोपीची ‘खैर’ नाही….
भंगार चोरी करून खाल्यानंतर डुंगनाला हात पुसून घेतल्याने आपलेच काहीच होणार नाही, असा समज या चोरी प्रकरणातील संशयितांना होता. मात्र त्यांनीच भंगार खाऊन ढेकर दिल्याने या प्रकरणाची चांगलीच बोंबाबोंब झाली. तपासतही नगरपालिकेच्यात कर्चाऱ्यानेच भंगार चोरी केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यावर संशय आहे तो कितीही शातीर ‘निती’ने वागला तरी त्याची ‘खैर’ केली जाणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.
हे भंगार झाले चोरी…
शाळा क्रमांक १० आणि सार्वजनिक शौलाचायाचे ८ ते १० लोखंडी दरवाजे अग्निशमन विभाग आणि आरोग्य विभागाच्या भिंतीसमोर ठेवले होते. हे दरवाजे, वापरत नसलेले कृमीनाशक फवारणी पंप, गुरुजी शाळेसमोरील व्यापारी संकुलातील अतिक्रमणात निघासेले ४ ते ५ लोखंडी शर्टस, स्वच्छ सर्वेक्षणासाठी ठेवलेल्या ५० लिटर क्षमतेचे सुमारे ५० ते ६० डस्टबिन आरोग्य विभागाच्या आवारातून चोरी झाले आहे.
मुख्याधिकारी म्हणतात…..
मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्याशी खबरीलालने संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, नगरपालिकेचे भंगार चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर लगेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ लिपीक सोमचंद संदानशिव यांना पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस या प्रकरणाची प्रथम चौकशी करणार असून नंतर दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.