अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील रणाईचे गांवाचे विभाजनाची अधिसूचना राज्याच्या ग्रामविकास विभागाच्याद्वारा जारी केली असून रणाईचे बु. व रणाईचे खु ह्या गांवाची निर्मिती करण्यात आली आहे.
तालुक्यातील सर्वाधिक बंजारा समाज बहुल लोकवस्तीचा रणाईचे येथील तांड्याचा समावेश रणाईचे ग्रामपंचायती अंतर्गत करण्यात आला होता. यामुळे तांडा वस्तीला भौतिक मुलभूतसुविधा उपलब्ध करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. रणाईचे गांवाचे विभाजन करून तांड्याला महसुली गांवाचा दर्जा मिळावा ही मागणी स्थानिक नागरिकांनी आ.स्मिता वाघ यांच्याकडे केली होती.आ.स्मिता वाघ यांनी मागणीचे महत्व लक्ष्यात घेवून शासनाच्या धोरणानुसार रणाईचे गांवाचे विभाजन करून तांडा वस्तीला महसुली गावाचा दर्जा मिळावा ही मागणी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली. नवीन महसुली गांवाची निर्मितीसाठी वित्तविभागाची सहमती आवश्यक असल्याने आ.वाघ यांनी राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुंगटीवारयांचाकडे देखील यासाठी पाठपुरावा केला होता. दरम्यान, रणाईचे गांवाचे विभाजनाची अधिसूचना राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या द्वारा दिनांक ३० जुलै रोजी जारी करण्यात आली असून अधिसूचनेनुसार रणाईचे गांवाचे विभाजन करून रणाईचे बु. व रणाईचे खु ह्या महसुली गांवाची निर्मिती करण्यात आली असून अधिसूचना जारी झालेल्या तारखेपासून रणाईचे बु. व रणाईचे खु ह्या महसुली गांवाची ओळख तयार झाली आहे. आगमी काळात नवीन ग्रामपंचायत कार्यालयाची तसेच इतर आवश्यक बाबीची निर्मिती शासनाकडून करण्यात येणार आहे. तालुक्यातील रणाईचे गांवाचे विभाजनाची अधिसूचना राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या द्वारा जारी करण्यात आल्यामुळे नागरिकांनी आ.स्मिता वाघ यांचे आभार व्यक्त केले आहेत तर आ.स्मिता वाघ यांनी राज्याच्या राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, वित्तमंत्री सुधीर मुंगटीवार पालकमंत्री गिरीष महाजन यांचे विशेष आभार व्यक्त केले आहे.