अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील हेडावे येथील जिल्हा परिषदेची संपूर्ण शाळा संततधार पावसामुळे गळत असल्याने विद्यार्थ्यांना बसण्यास वर्गात जागा नाही, शाळा जीर्ण झाल्याने स्लॅबला तडे गेले आहेत. त्यामुळ विद्यार्थी जीव धोक्यात घालून वर्गात बसत आहेत. त्यामुळे ‘शिक्षणाच्या आयचा घो’ करीत संतप्त पालकांनी शुक्रवारी शाळेला टाळे ठोकले.
पालकांनी याबाबत गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन याना निवेदन एक महिन्या आधी निवेदन देऊन शाळा दुरुस्तीची मागणी केली होती, मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शुक्रवारी शाळा सुरू होताच संतप्त पालकानी शाळेत येऊन शाळेला कुलूप ठोकले आहे. संततधार पावसाने शाळेची इमारत गळत आहे, गेल्या दोन दिवसापासून पालकांनी गटशिक्षणाधिकारी महाजन याना याबाबत पुन्हा कल्पना दिली, मात्र उघडीप मिळाल्यावर इमारत दुरूस्त करू असे उत्तर दिल्याने पालकांचा संताप अनावर झाला, दुरुस्त होई पर्यंत विद्यार्थ्यांनी कुठे बसावे असा प्रश्न पालकांपुढे होता, शाळेच्या खोल्या गळत असल्याने शाळेच्या आवारात असलेले शालेय पोषण आहाराचा खोलीत विद्यार्थ्यांना बसवलं जात होतं मात्र त्या खोल्या देखील जीर्ण आहेत, त्यामुळे शाळा सुरू होताच पालकांनी शाळेला कुलूप ठोकले आहे, यावेळी ग्रा,प सद्स्य मनिषा भास्कर पाटील, विकास सोसायटी चेअरमन भास्कर रामदास पाटील, ग्रां ,प सदस्य कुंदन मोतीलाल पाटील, आणि पालक किशोर पाटील, प्रकाश मोरे,दिनेश पाटील, समाधान सोनवणे, गौतम ढिवरे, आदी उपस्थित होते.
शाळेत ३३ विद्यार्थी घेतात शिक्षण…
“हेडावे येथे पहिली ते पाचवी असे वर्ग असून दोन शिक्षक कार्यरत आहेत, एकूण ३३ इतकी विद्यार्थी संख्खा आहे”,
शाळा जीर्ण झाली आहे, त्यामुळे ती गळते आहे, पर्यायी खोल्या देखील गळत आहेत, त्यामुळे आहे त्या परिस्थितीत आम्ही मुलांना शिक्षण देत आहोत – उज्वला शिंदे, शिक्षिका
अशी आहे पटसंख्या…
पट संख्या- इयत्ता १ ली = ५, इयत्ता २ री = ७, इयत्ता ३ री = ७, इयत्ता ४ थी = १४
शाळा केंव्हा ही पडू शकते……
शाळेच्या स्लॅब ला तडे गेले आहेत शाळा केंव्हा ही पडू शकते त्यामुळे मुलांच्या बाबतीत आम्ही धोका घेऊ इच्छित नाही म्हणून पालकांनी हे पाऊल उचलले आहे – भास्कर पाटील, पालक