अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील फिनिक्स सोशल अवेरनेस गृपतर्फे क्रांति दिन व आदिवासी दिवस साजरी करण्यात आला.यावेळी अमळनेर शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारातील दुसर्या महायुद्धात शहीद झालेल्या हुतात्मांचे स्मारक,साने गुरुजी पुतळा,सुभाषचंद्र बोस पुतळा,संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत शहीद झालेल्या हुतात्म्यांचे स्मारक लाल बावटा,राणी लक्ष्मीबाई चौक,डाॅ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,पैलाड येथील संविधान,स्मारक,संत गाडगे बाबा, अहिल्याबाई होळकर, महाराणा प्रताप,अन्नाभाऊ साठे स्मारक तसेच बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला तहसिलदार ज्योती देवरे,पोलिस निरीक्षक अंबादास मोरे,सहा पोलीस निरीक्षक राहुल फुला,गृपच्या अध्यक्षा अॅड ललिता पाटील यांच्या हस्ते पुष्पचक्र व पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
या वेळी अमर रहे ,अमर रहे क्रांतिवीर अमर रहे.भारत माता की जय,वंदे मातरम अशा घोषणा देत अभिवादन करण्यात आले.खा शि मंडळाच्या विश्वस्त वसुंधरा लांडगे,सुचिता पाटील,प्रतिभा मराठे,मा नगराध्यक्ष सुभाष चौधरी,प्राचार्य प्रकाश महाजन,पो काॅ सुनिल हटकर, भिलाली उपसरपंच अमोल माळी,दत्तु पाटील,मोहन चौधरी,गणेश मोरे यासंह नागरीक उपस्थित होते.