अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात पावसाने चांगलेच झोपडले असून शेतात पाणी शिरल्याने पिकंची दैना झाली आहे. तर घरांचीही पडझड झाल्याने अनेकांच्या संसाराचा कणाही मोडला आहे. पावसाच्या हा हाहाकाराने सर्वच हैराण झाले आहेत.
अमळनेर तालुक्यात ८ रोजी रात्री सरासरी ७१. २५ मिमी पाऊस झाला अाहे. सर्वाधिक १०१ मिमी पातोंडा मंडळात पाऊस झाला अाहे. शहरासह एकूण १३३ घरांची पडझड झाली तर बामणे गावाजवळील पांझरा नदीवरील बंधारा फुटल्याने पुढील गावाना धोका निर्माण झाला आहे.
तळवाडे ८, आर्डी ७, आनोरे १, अमळनेर ४, रणाईचे बु २, हिंगोने सिम २, अनचलवाडी २, चौबारी १८, बाम्हणे ६, भिलाली ३, डांगरी ५, गोवर्धन ९, मारवड ५, पिंगळवाडे १, हिंगोने खु १, कलाली १, निंभोरा ६, कचरे १, मांजर्डी १, पातोंडा ५, मांडळ ५, शहापूर १६, सारबेटे बु १, लोणसीम १, वावडे ४, लोण खुर्द ३ ,नगाव बु १, निमझरी १, जळोद १, मुडी प्रगणे डांगरी ५, लोण बु १, लोण तांडा १ असे एकूण १३३ घरांची पडझड झाल्याची माहिती नायब तहसीलदार बी. डी. धिवरे यांनी दिली पैकी २० घरांचे पंचनामे झाले आहेत मात्र मदतीसाठी तलाठी, ग्रामसेवक पांझरा काठावरील गावना गेल्याने पंचनामे उशिरा करण्यात येणार आहेत.
मदतीला धावले….
तहसीलदार ज्योती देवरे ,मंगळ ग्रह संस्थान तर्फे राजू महाले, आमदार स्मिता वाघ , आमदार शिरीष चौधरी अनिल भाईदास पाटील , साहेबराव पाटील यांच्यासह स्थानिक व परिसरातील नागरिक मदतीला धावले.
३ हजार हेक्टर शेती पाण्याखाली….
पातोंडा परिसरात १०१ मिमी पाऊस झाल्याने पातोंडा , जळोद , मथगव्हान , रुंधटी , नालखेडा , गंगापूरी आदी परिसरातील शेतीत पाणी साचले आहे सुमारे ३ हजार हेक्टर शेती पाण्याखाली आली असून अजून किमान २ दिवस पाणी कमी होणार नसल्याने शेतीचे नुकसान झाले आहे पिके सडणार असल्याने उत्पन्न हातचे जाणार आहे शेतीचा पंचनामा करून नुकसान भरपाई करण्याची मागणी आमदार स्मिता वाघ यांनी केली आहे कृषी सहाययक दिनेश पाटील , धीरज पाटील , किरण पवार यांच्यासह ग्रामस्थांनी प्राथमिक पाहणी केली.