चला, सांगली, कोल्हापूर पूरग्रस्त बांधवांना मदतीसाठी आपणही उचलू खारीचा वाटा…

अमळनेर (प्रतिनिधी) पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूरला महापूराने वेढा घातला आहे. त्यामुळे मानुसकीच्या नात्याने तेथील समाजबांधवांना मदत करण्यासाठी अमळनेर शहरातून पुरग्रस्तांसाठी संकल मोहीम राबवण्यात येणार आहे. ही मोहीम अमळनेर तालुका गिरीभ्रमण ग्रुप, अमळनेर सायकलिस्ट ग्रुप, अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशन, धुळे सायकलिस्ट, शिरपूर सायकलिस्ट, रा.स्व.संघ जळगाव यांचे कार्यकर्ते राबवणार आहे. आज पासून मदत संकलनास सुरुवात होणार आहे.तर दिनांक ११ ऑगस्ट पर्यंत सायंकाळी ५ वाजे पर्यंत अमळनेर येथील ओम क्लिनिक द्रौ.रा.कन्या शाळे समोर, न्यू प्लॉट येथे मदत देऊ शकतात.

आपण काय देऊ शकता…

या संकलन मोहिमेत आपण डाळी, साखर, तेल, बॅटरी, मेणबत्त्या, माचीस बॉक्स, टुथ ब्रश, पेस्ट, फूड प्लेटस्, साबण, ब्लँकेटस्, शाल, बपेडशीट, मच्छरदाणी, मच्छरकॉईल, पॅकिंग असलेले फुड पॅकेट्स, बिस्किट पुडे, ओआरएस पॅकेट्स, इंस्टंट फुड पॅकेट, नवीन (चांगले वापरण्याजोगे) कपडे, उबदार कपडे, लहान मुलांचे कपडे, सॅनिटरी नॅपकिन्स आदी वस्तू देऊ शकता.

अधिक माहितीसाठी यांच्याशी साधा संपर्क

या मोहिमेच्या मदतीसाठी डॉ.चंद्रकांत पाटील- 9960055956, संदीप पाटील- 9970050101, सागर अहिरे- 9028541109, प्रदीप कंखरे- 9890868209 यांच्याशी संपर्क साधावा.

खबरीलालचेही कळकळीचे आवाहन

सांगली, कोल्हापूरला महापूराने पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. अन्न, पाण्यावाचून तेथील आपल्या बांधवांचे हाल होत आहे. अशा संकटाच्या वेळी माणुसकीचा समाजधर्म म्हणून प्रत्येकाने आपल्यापरी काहीना काही मदत करणे आवश्यक आहे.दिनांक ९ ऑगष्ट पासून अमळनेर शहरात राबवण्यात येणाऱ्या संकलन मोहिमेत आपलाही खारीचा वाटा म्हणून फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून सढळ हाताने मदत करण्यासाठी पुढे यावे, यासाठी नेहमीच आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडणार आणि आपल्याला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या खबरीलालचेही आपल्याला कळकळीचे आवाहन करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *