अमळनेर(प्रतिनिधी)संततधार पावसामुळे अमळनेर तालुक्यातून जाणारी तापी, पांझरा नदीला पूर आले आहेत. त्यामुळे अमळनेर तालुक्याच्या काही गावना जलसंकट उभे राहिले असून तहसीलदार ज्योती देवरे यांनी तातडीची बैठक घेऊन १२ गावांना आपत्कालीन पथक रवाना करून जागेवर सज्ज केले आहेत. बेटावद जवळील पुलालाही धोका असल्याने शिंदखेडा , शिरपूर कडील वाहतूक बंद करण्यात आली असून जलसंकटाचा सामना करण्यासाठी तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली यंत्रणा सजग झाली आहे.
पांझरा नदीतून ५३ हजार क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे तर तापी नदीला दीड लाख क्यूसेसने पाणी सोडण्यात आले असून संतत धार पावसाने नाले देखील वाहू लागले आहेत त्यामुळे तापी नदी पाणी स्वीकारणार नाही. बॅक वॉटर मुळे पांझरा काठावरील मांडळ, कळंबू , बाम्हणे , भिलाली, मुडी , बोदर्डे, शहापूर , तांदळी आदी गावांना धोका संभवतो. गावात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांनी पथके तयार करून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची रजा नामंजूर करून जिल्हा परिषद शिक्षक, ग्रामसेवक तलाठी आदींना गावातच थांबण्याचा सूचना देऊन जिल्हा परिषद शाळेत नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तालुक्याची आपत्कालीन समन्वय समिती स्थापन केली आहे. त्यात तहसीलदार, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी , बांधकाम विभाग अभियंता , पोलिस अधिकारी यांचा समावेश आहे. तहसील कार्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करून त्याचे प्रमुख उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड आहेत. तर आपत्कालीन मदत कक्षाचे प्रमुख म्हणून निवासी नायब तहसीलदार बी. डी. धिवरे यांची नियुक्ती केली आहे.
पाडळसे धरणाच्या कार्यकारी अभियंत्यांची पूरग्रस्त बैठकीला ‘देशमुखी’थाटात दांडी…
महाराष्ट्रात जलसंकटाने हाहाकार माजवला आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते ग्रामपंचायतीच्या शिपायापर्यंत सर्वच जन या जलसंकटाचा सामाना करण्यासाठी तत्पर झाले आहे. अमळनेर तालुक्यातही पांझरा आणि तापीच्या पुराने अनेक गावांना वेढा टाकला आहे. या पूरपस्थिताचा सामना करण्यासाठी तहसीलदारांनी कंबर कसली आहे. यासाठीच त्यांनी तालुका प्रशासनाची जबाबादारी म्हणून शुक्रवारी सर्व शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्चाऱ्यांची तातडीची बैठक बोलून यंत्रणा सज्ज केली. मात्र या बैठकीला खऱ्या अर्थाने पाण्याशी संबंध असलेल्या अशा निम्न तापी प्रकल्पाच्या पाडळसे धरणाच्या कार्यकारी अभियंत्या रजनी देशमुख यांनी दांडी मारली. त्यांनी त्यांच्या विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठवून बैठक अटेंड करण्यास सांगितले. त्यांचे कर्मचारीही त्यांच्या अर्विभावात तहसीलदारांना फोन करून हे आमचे नेहमीच काम असल्याचे सांगून आम्ही साईटवर असल्याचे सांगतात. खरे तर पूरपरिस्थिचे नियंत्रण हे प्रशासकीय समन्वयातून चांगल्याप्रकारे करता येऊ शकते. मात्र निम्न तापी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता रजनी देशमुख या नेहमीच आपल्या विभागीशी संबंधित आंदोलने बैठकांकडे दुर्लक्ष करून देशमुखी थाटात वावरत असल्याने तहसीलदांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
अनेक ठिकाणी घरे पडली…
पातोंडा , बोडर्डे, लोण सिम , लोण चारम तांडा, वावडे , जळोद , शहापूर , बोहरा या गावांना सुमारे १५ घरे पडली आहेत. घरांना ३२०० ते ५२०० रु तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे.
तीन गावांना पाण्याच्या वेढ्याची शक्यता…
तापी काठावरील कलाली, बोहरा , सात्री आदी गावांना वेढा पडण्याची शक्यता असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. त्या ठिकाणी नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी पथक सज्ज ठेवले आहे.
तीन पूल बंद…
तालुक्यातील मुडी वालखेडा पूल वाहून गेल्याने सोनगीर, दोंडाईचा वाहतूक बंद झाली आहे. तर बेटावद येथील पुलालाही धोका असल्याने त्यावरील शिरपूर , शिंदखेडा, नंदुरबार वाहतूक बंद करण्यात आली आहे तर तापी नदीवरील सावखेडा पुलालाही धोका असल्याने चोपडा, यावल , रावेर, मध्य प्रदेशकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे.
या बैठकीस पोलिस निरीक्षक अंबादास मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, मारवडचे एपीआय राहुल फुला , गटविकास अधिकारी अजय कुमार नष्टे, तापी पाटबंधारेचे सुनिल मोरे, दुय्यम निबंधक डी. पी. गांगोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे, न.प.वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भोई, बांधकाम विभागाचे उप अभियंता एस. डी. सूर्यवंशी , कृषी अधिकारी बी. व्ही. वारे, नगरपरिषद अधिकारी संजय चौधरी , शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी. धनगर , नायब तहसीलदार आर. बी. मंडलिक, मंडळ अधिकारी एस. एम. गवळी , जि.प. उप अभियंता आर. आर. गांगुर्डे , निम्न तापी प्रकल्प विभागाचे सु. श. मुदिराज, नी. वा. जाधव , उपअधीक्षक भूमी अभिलेख बी. सी. अहिरे, तलाठी डी. एस. बाविस्कर, हर्षवर्धन मोरे, पी. एस. पाटील, एन जी कोचुरे, एस जी पंचभाई, धीरज देशमुख, एन डी धनराळे, एस. आर. भोसले, एस. के. आढाव ,एस. एम. कुलकर्णी, ग्रा. रु. लिपिक डी.पी.बोरसे ,आर. जी. गरुड, पत्रकार संजय पाटील, खबरीलालचे संपादक जितू ठाकूर, मंडळधिकारी वाय. व्ही. पगारे हे उपस्थित होते.