झाडी येथे ग्रा.प.इमारत व सभागृहाचे आ.शिरीष चौधरींच्या हस्ते भूमिपूजन

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील झाडी येथे ग्रामपंचायत इमारत व सामाजिक सभागृहाचे भूमीपूजन आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य रस्त्यालगत झाडी गाव वसलेले असल्याने विकासाच्या माध्यमातून हे गाव अधिकाधिक सुशोभित करण्याचा मानस व्यक्त केला.
आ चौधरींनी अनेक गावांत नव्या ग्रा प इमारतींचे निर्माण केले असल्याने झाडी ग्रामस्थांनी देखील गावात नव्या ग्रा प इमारतीची अपेक्षा केली होती,आ चौधरींनी लागलीच ग्रामस्थांची अपेक्षापूर्ती करून भूमीपूजनाचा मुहूर्त देखील केल्याने ग्रामस्थानी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले. यावेळी झाडी येथील उदय माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आमदार चौधरीच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.यावेळी आमदारांनी या वृक्षांचे संवर्धन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमास झाडी सरपंच तापाबाई एकनाथ भिल,उपसरपंच डॉ.भुपेंद्र नानभाऊ पाटील, नगरसेवक किरण बागुल, उदय माध्यमिक विद्यालय चेअरमन धनगर दला पाटील, माजी सरपंच शिरसाळे सुदाम चौधरी, भूषण पाटील,वसंत गोसावी, रणजित राजपूत, सुभाष आबा पाटील,सामाजिक कार्यकर्ते सिताराम बागुल, संभाजी देवरे, श्याम पाटील,डॉ सुनील पाटील,मयूर पाटील,अनिल पाटील,दिनेश पाटील, रवींद्र पाटील यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *