अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील पूज्य सानेगुरूजी शिक्षक व शिक्षकेतर कमर्चारी पतपेढीच्या गेल्या निवडणुकीची चौकशी होऊन नवीन निवडणूक प्रक्रिया राबविण्याबाबत राज्य सहकारी निवडणूक आयुक्त आणि नाशिक विभागीय सहनिबंधकांनी आदेश देऊनही मगरमच्छ गिळून सुस्तावलेल्या अजगारासारखी कोणतीही हालचाल न करताना जिल्हा उपनिंबंधक कार्यवाही करीत नाही. त्यामुळे ही पतपेढीही अन्य पतपेढ्यांप्रमाणे खड्यात घातल्यावरच यंत्रणा कुंभकर्ण झोपेतून जागे होईल, काय असा प्रश्न शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित करीत आहेत.
दळभद्री आणि भ्रष्ट अध्यक्ष व संचालक मंडळाच्या अवकृपेने संपूर्ण महाराष्ट्रात पतपेढ्यांची वाट लागेली आहे. या पतपेढ्यांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराचा वास सहकार क्षेत्राच्या सरकारी यंत्रणेला असतो. पण या भ्रष्टाचारातूनच मलिदा मिळत असल्याने तक्रार येऊनही कोणतीच कारवाई करायची नाही, अशी मानसिकता असल्याने त्यांनी सहकार क्षेत्राचे पूर्ण वाटोळे करून टाकले आहे. हीच परिस्थिती आता अमळनेर येथील पूज्य सानेगुरुजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पतपेढीवर येऊन ठेपली आहे. सुमारे ७०० ते ८०० सभासद असलेल्या या पतपेढीची वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल आहे. गेल्या निवडणुकीत सभासद सुशीलकुमार धनंजय भदाणे यांच्या नावात हेतुपुरस्कर निवडणूक प्रक्रियेत बदल केले होते. त्यामुळे त्यांनी तक्रार करून निवडणूक निर्णय अधिकारी डी.एल.साळुंखे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून नवीन निवडणूक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांना चौकशी करून नवीन निवडणूक प्रक्रिया राबवण्याबाबात निवडणूक प्राधिकरणाने एप्रिल २०१७ रोजी, नोव्हेंबर २०१७ आणि ७ मे २०१९ तसेच राज्य सहकारी निवडणूक आयुक्तांनी ३ जून २०१९ रोजी दूरध्वनी संदेश दिला होता. याचबरोबर ११ जून २०१९ च्या पत्रान्वये आदेश दिले होते. पण सुस्त असलेले जिल्हा उपनिबंधांनी दोन वर्षात आदेश येऊनही कोणतीही कार्यवाह केली नाही. त्वरीत या प्रकरणी कारवाई न झाल्यास १५ ऑगस्टपासून जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालसमोर उपोषण करण्याचा इशारा भदाणे यांनी दिला आहे.
चोराच्या हातात पतपेढीच्या चाव्या….
पूज्य सानेगुरूजी शिक्षक व शिक्षकेतर कमर्चारी पतपेढीचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र भगवंतराव पवार हे जानवे येथील शाळेतून सेवानिवृत्त झाले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक त्वरीत घेण्यात यावी, अशी मागणी सभासद जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. कारण नोकरीतून सेवानिवृत्त झालेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला पतपेढीच्या अध्यक्षपदी राहण्याचा अधिकार नाही. मात्र पवार हे अध्यक्षपदाला चिक्कीच्या गुळासारखे चिकटून बसले आहेत. निवृत्त होऊनही त्यांचा अध्यक्षपद सोडण्याचा मोह सुटलेला नाही. विशेष म्हणजे पवार हे अन्य एका ट्रस्टवरही अध्यक्ष आहे. त्यामुळे इकडचा पैसा तिकडे वर्ग करणे त्यांना सहज शक्य होत आहे. त्यामुळे चोराच्या हातात चाव्या दिल्यासारखी परिस्थिती या पतपेढीची झाली आहे. मात्र जिल्हा उपनिबंध यांनी दोन्ही तक्रारी आणि मागण्यांकडे कोनाडोळा केला आहे. यामागील गौडबंगाल काय आहे की काही मोठी देवान-घेवाण झाली आहे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला असून असे झाले असले तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा कष्टाचा पैसाही सुरक्षित नसल्याची भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे या पतपेढीत मोठा गफला झाल्यावरच यंत्रणेला जाग येईल काय, असा प्रश्न शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित करीत आहेत.
विना सहकार नाही उद्धारचा विसर….
विना सहकार नाही उद्धार असे ब्रिद असलेल्या सहकारी क्षेत्रात कीड लागलेल्या अधिकाऱ्यांमुळे तक्रार करूनही कोणतीच कार्यवाही होत नसल्याचे यावरून दिसते. कितीही तक्रारी केल्या तरी गेंड्याची कातडी पांघरलेले अधिकारी जागचे हालत नाही. त्यामुळे सर्व सामान्यांचा जळफळाट होतो. अशा नतभ्रष्ट अधिकाऱ्यांमुळेच सहकार क्षेत्र लयासा जात आहे. वरिष्ठांच्या आदेशालाही जूमानत नसल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संतप्त झाले आहेत. त्यांचा केव्हाही उद्रेक होऊन मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.