अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर मंगळवारी नदीला आलेला पूर ओसरल्यावर जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील यांनी पूरग्रस्त दुकानदारांची भेट घेतली व पांझरा नदीच्या पाण्याचे जलपूजन केले.
पांझरा नदीला रविवारी रात्री आलेल्या महापूराच्या पाण्याने मुडी व बोदर्डे येथील झालेल्या नुकसानीची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांनी पाहणी केली. यावेळी मुडी बसस्थानक परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये पुराचे पाणी घुसले होते त्यामुळे दुकानदारांच्या वस्तूंचे पाण्याने नुकसान झाले होते त्याबाबत पाटील यांनी नुकसान पाहणी करून दुकानदार व गावकर्यांशी चर्चा केली.
नदीचे केले जलपूजन – यंदाच्या पावसाळ्यात पांझरा नदी भरभरून वाहिली त्यामुळे दुष्काळी सावट दूर झाले आहे. उन्हाळ्यात हीच नदी व तिच्यावर असलेल्या विहिरी शासकीय पाणी पुरवठा करण्यासाठी वरदान ठरल्या होत्या कुठेही पाणी नसतांना या नदीला आलेल्या अवर्तनाने शासनाला तारले होते. व पाण्याची टंचाई भागवता आली. त्यामुळे पांझरा नदी जीवनदायिनी ठरली आहे त्यासाठी गावकऱ्यांच्या आग्रहानुसार जिल्हा बँक संचालक अनिल पाटील यांच्या हस्ते पांझरा नदीचे जलपूजन करुन साडी चोळी अर्पण केली यावेळी मुडीचे सरपंच काशिनाथ महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंमतराव पाटील, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाउपाध्यक्ष गौरव पाटील, ग्रा.पं.सदस्य गजेंद्र सोनवणे, गुणवंत पाटील, तुषार पाटील, किशोर पाटील, शांताराम पाटील, किशोर पाटील सरदार कोई दिलीप देशमुख नितीन पाटील, रावसाहेब पाटील, राजू पाटील, हिम्मतराव पाटील, प्रदीप पाटील व मुडी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.