अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या आवारात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे ची नोंदणी खुलेआम चालू होती. महाविद्यालय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला पाठीशी घालत आहे असा आरोप करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज महाविद्यालयात ठिय्या देत आंदोलन केले व प्राचार्यांना निवेदन दिले. महाविद्यालयीन निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. म्हणून विद्यापिठाच्या नियमानुसार महाविद्यालयाच्या 100 मीटर बाहेर बाहेर अभाविप ने सदस्य नोंदणी करावी. अशी विनंती केली तरीही सदस्य नोंदणी सुरू होती. त्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने प्रताप महाविद्यालयाच्या कार्यालयासमोर ठिय्या देत आंदोलन केले. 2011-12 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रताप महाविद्यालयाला साडेनऊ लाख रुपये दिले होते त्याचा अजून महाविद्यालयाने खुलासा केलेला नाही व 2018-19 मध्ये शासनाने अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केलेला होता व दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची ची फी माफ केली होती ती अजूनही विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झालेला नाही या प्रकरणाची ची चौकशी व्हावी अश्या मागण्या करत विद्यार्थ्यांनी ठिय्या दिला व विद्यार्थी परिषदेला काही शिक्षक व महाविद्यालय पाठीशी घालत आहे याचा देखील निषेध नोंदविण्यात आला.