अमळनरे(प्रतिनिधी) अमळनेर येथील वर्णेश्वर महादेव मंदिरातर्फे यंदाही इच्छापूर्ती कावड यात्रा उत्साहात संपन्न झाली. कावड यांत्रींनी तापीच्या जलाने वर्णेश्वर महादेव मंदिरात विधीवत जलाभिषेक केला.
जळोद येथील तापीनदीवर सकाळी ९ वाजता ग्रास्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उषाबाई चौधरी यांनी विधीवत पूजा करून घोड्यावर विधीवत पूजा केली. या वेळी शिवदास सुभेदार आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमळगाव येथे रामराज्य फाउंडेशन व इंजिनिअर गिरीश मित्र परिवार यांनी शिव भक्तांचे स्वागत करून महाप्रसाद वाटप केला. शिवभक्तांना भेट देण्यासाठी माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील, संतोष पाटील, जाकीर शेख, भरत चौधरी, मौजी बग्गा, वानखेडे, किरण पाटील, चेतन राजपूत,पक्षी मीत्र सुनील भोई, सुंदरपट्टीचे सरपंच सुरेश पाटील, आमदार शिरीष चौधरी, प्रवीण पाठक, उमेश साळुंखे आदी भर पावसात आले होते. गांधली येथील ग्रामस्थ काशिराव साळुंके, विनोद देशमुख, विठोबा माळी, प्रकाश पाटील, रोहिदास पाटील, अनिल पाटील यांनीही स्वागत केले.
तर सप्तश्रृंगी मंदिरावर गोरख पारधी यांनी स्वागत केले. रेल्वेगेटजवळ अतुल असोदेकर मित्र परिवाराचे विनोद निकुंभ, दीपक पाटील, मेहंद्र वाघ, गुलाब पाटील यांनी मसाले भात व चहा देऊन स्वागत केले.