अमळनेर (प्रतिनिधी) कावळ्या शापने गाय मरत नाही, असे म्हटले जात असले तरी माणसातील कावळ्याच्या शापने अमळनेर येथील बालाजी पुरातील रहिवासी विद्या महाजन यांचे कुंकू पुसले जाऊन त्यांचे कपाळ उजाड झाल्याने त्यांच्या भरल्या संसारात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यमदूत ठरलेला डॉक्टर आणि औषधी विक्रेता यांच्या विरोधात सात महिने अहोरात्र झगडून अखेर गुन्हा दाखल झाल्याने या माउलीला थोडेफार यश आले असले तरी या दोघा नराधमांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय त्यांना न्याय मिळणार नाही, अशी भावान सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
बालाजी पुरातील रहिवासी असलेले शालीकराम परशुराम महाजन (वय ४२) यांना २६ जानेवारी २०१९ ला खोकल्याचा त्रास जाणवत होता. तीन दिवसापासून खोकला जात नसल्याने त्यांनी त्रिकोणी बागेजवळील द्वारका क्लिनिकमधील डॉ. पद्मनाभ पाटील यांच्याकडे उपचारासाठी धाव घेतली. या वेळी डॉ. पाटील यांनी त्यांना “ॲझीथ्रो २५० एमजी” (सहा गोळ्या) व “रेफी कोल्ड” (सहा गोळ्या) ही औषधी लिहून दिल्या. ही चिठ्ठी घेऊन रूग्ण शालीकराम महाजन हे गजानन मेडिकल चालक किशेार श्री किसन लाखोटे यांच्याकडे गेले. त्यांनी पहिली गोळी बरोबर दिली. मात्र, दुसरी डॉक्टरांनी न लिहून दिलेली सिनोडेक कोल्ड ही गोळी दिली. या गोळ्या सेवन केल्याने त्याचा दुष्परिणाम होऊन त्यांची प्रकृती अधिक खालावली. त्यानंतर त्यांना एका खासगी रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा २७ जानेवारी २०१९ ला मध्यरात्री एकच्या सुमारास मृत्यू झाला. दरम्यान, विद्या महाजन या संबंधित औषधी विक्रेत्याकडे उपचारावेळी गेल्यावर माझ्या पतीस तुम्ही चुकीची गोळी दिल्याने त्रास झाल्याचे सांगितले. या वेळी संबंधित औषधी विक्रेत्याने ‘माझ्या तीन रुपयाच्या गोळीत तुमचा नवरा मरणार नाही. मेला तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, मग मी पण मरून जाईल’ हा तरोटा अशा उर्मट शब्दात बोलून अशी वागणूक दिल्याचे महाजन यांनी सांगितले. मात्र महाजन यांचे दुर्दैव म्हणून या औषध विक्रेत्याची जीव खरोखर काळी ठरली आणि त्यांचे सौभाग्य उजाळले गेले. ओकसा बोगसा रडत पतीला अंतिम निरोप दिला. स्वतःला सावरत आता रडायचे नाही लढायचे असा मनात विश्वास बांधून त्यांनी या दोन्ही नराधमांच्या विरोधात लढा सुरू ठेवून त्या केसचा पाठपुरावा केला. या प्रकरणाची सर्व वैद्यकीय कागदपत्रे, विच्छेदनाचा, व्हिसेरा अहवाल आदी कागदपत्रांची पडताळणी करून हा अहवाल जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे ठेवण्यात आला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या एका समितीने या अहवालावर निष्कर्ष काढून गुन्हा दाखल करण्याबाबत मान्यता असल्याचा अहवाल दिल्याने हा गुन्हा आज दाखल झाला. तब्बल सात महिन्यानंतर गुन्हा दाखल झाल्याने श्रीमती महाजन यांचे मोठे आर्थिक नुकसानही झाले. तसेच त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले आहे.
नुकसान भरापाईसह दोषांना कठोर शिक्षा व्हावी…
पतीच्या मृत्यूमुळे विद्या महाजन यांचा संसार उद्ध्वस्थ झाला आहे. संसार उघड्यावर आला आहे. कर्ता पुरूषच गेल्याने प्रपंच कसा चालवाला, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. त्यामुळे या दोन्ही नराधमांकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा होण्याची मागणी नातेवाइकांसह बालाजी पुरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.