अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरात देव दर्शनाला आलेल्या टाकरखेडा येथील महिलेला चांगलेच महागात पडले. ते देवदर्शन करून घरी परतत असताना बसमध्ये त्यांची ४५ हजाराची सोनपोत लांबल्याची घटना घडली.
अमळनेर जळगाव बसमध्ये चढताना टाकरखेड्याच्या महिलेची ४० हजार रुपयांची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यने लंपास केल्याची घटना ५ रोजी दुपारी साडे बारा वाजता घडली
अरुणाबाई गुलाबराव पाटील रा टाकरखेडा ही महिला देवदर्शनासाठी अमळनेरला आली होती ती परत टाकरखेडा जाण्यासाठी निघाली असताना दुपारी साडे बारा वाजता टाकरखेडा मार्गे जळगाव गाडीत चढताना अज्ञात चोरट्याने तिच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची १५ ग्राम वजनाची सोन्याची पोत चोरून नेली याबाबत पोलीस स्टेशनला भादवी ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक राजेश चव्हाण करीत आहेत.