अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती वर महाजन, तेली, राजपूत, धनगर समाजाला प्रतिनिधीत्व देऊन आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ‘राजकीय मशागत’ करण्यात आली आहे.
बाजार समितीच्या स्विकृत संचालकपदी आटाळे येथील प्रकाश भिमसिंग पाटील तर तज्ज्ञ संचालकपदी कळमसरे येथील मुरलीधर महाजन, शिरूड येथील डी. ए.धनगर व जळोद येथील एम डी चौधरी यांची नियुक्ती संचालक मंडळाने एकमताने केली अाहे. यानिमित्ताने शेतीप्रदान असलेल्या राजपूत, माळी, तेली आणि धनगर समाजास प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे आमदार स्मिता वाघ व भाजपा नेते उदय वाघ यांच्या मार्गदर्शना खाली हा निर्णय घेण्यात आला. बाजार समिती अधिनियमानुसार संचालक मंडळात तज्ञ संचालक घेण्याची तरतूद असून एक संचालक आधीच अपात्र ठरले आहेत, त्याअनुषंगाने आमदार वाघ आणि उदय वाघ यांनी तालुक्यातील जो समाज शेतीशी निगडित असून ज्या समाजाचे नेहमीच बाजार समितीशी अनेक वर्षांपासून जवळचे संबंध आहेत, अशा समाजातील जानकार व अभ्यासू व्यक्तीना तज्ञ संचालकपदी नियुक्त करावे अशी अपेक्ष संचालक मंडळाकडे व्यक्त केली होती. माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनीही हीच अपेक्षा व्यक्त केली होती त्या अनुषंगाने राजपूत,माळी,धनगर आणि तेली समाजाचा प्राधान्याने विचार करण्यात आला होता,सदर नियुक्ती संदर्भात राजपूत,माळी,आणि धनगर समाजाच्या शिष्ट मंडळाने भाजप नेते उदय वाघ,आमदार स्मिता वाघ,सभापती प्रफुल्ल पवार,उपसभापती अॅड. एस एस ब्रह्मे व संचालक मंडळाची भेट घेऊन आपल्या समाजास मार्केटमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळण्यासाठी विनंती करून सर्वानुमते एक नाव दिले होते.त्यानुसार राजपूत समाजाचे आटाळे येथील प्रकाश भिमसिंग पाटील(सदाबापू),यांची स्विकृत संचालकपदी,तर कलमसरे येथील उपसरपंच मुरलीधर महाजन, शिरूड येथील धनगर समाजाचे ज्ञानेश्वर आधार धनगर ( डी ए धनगर),यांची शिफारस करण्यात आली.यावर सभापती प्रफुल्ल पवार,उपसभापती ऍड एस एस ब्रह्मे आणि संचालक मंडळाने एकमताने शिक्कामोर्तब केल्याने चौघांची संचालक पदी नियुक्ती झाली आहे. प्रकाश पाटील हे आटाळे येथील माजी सरपंच तथा प्रगतिशील शेतकरी स्व.भिमसिंग पाटील यांचे पुत्र असून ते विद्यमान उपसरपंच आहेत,अनेक वर्षांपासून गावात त्यांची सत्ता असून भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते ते आहेत.मुरलीधर महाजन हे माळी महासंघाचे पदाधिकारीं असून कळमसरे येथे उपसरपंच व उद्योजक आहेत, डी.ए.धनगर हे शिरूड चे माजी उपसरपंच असून सानेगुरुजी विद्यालयात उपक्रमशील शिक्षक म्हणून ते सुपरिचित आहेत. धनगर समाज कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.तर एम डी चौधरी हे जळोद येथील तेली समाजाचे सक्रिय पदाधिकारी असून भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते आहेत.
बाजार समितीत सत्कार सोहळा….
नियुक्तीनंतर बाजार समितीच्या आवरात चौघांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला,चौघे पदाधिकार्यांचा सर्व स्तरातून सत्कार झाला,यावेळी आ स्मिता वाघ,माजी आ साहेबराव पाटील, उदय वाघ,सभापती प्रफुल्ल पवार, उपसभापती ऍड ब्रह्मे,शहराध्यक्ष शितल देशमुख,विक्रांत पाटील व संचालक उपस्थित होते,याप्रसंगी राजपूत,माळी, धनगर आणि तेली समाजाच्या पदाधिकार्यांनी आमदरा स्मिता वाघ, उदय वाघ, माजी आमदार कृषीभुषण साहेबराव पाटील आणि संचालक मंडळाचे विशेष आभार व्यक्त केले.