अमळनेर(प्रतिनिधी) पांझरा नदीच्या पुरामुळे बाधित झालेल्या अमळनेर तालुक्यातील गावांमध्ये तालुका प्रशासन अधिकारी व कर्मचारी रात्रभर पहारा देऊन नागरिकांचे संरक्षण करणार आहेत.
धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा (पांझरा नदी) धरणातून संपूर्ण एकूण-१७ दरवाज्यांतून आज ५ जुलै रोजी दुपारी ३८,५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे .सदर विसर्ग जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील नदी काठच्या आठ गावांपर्यंत पोहचणार असल्याने धोकाग्रस्त मांडळ,मुडी,बोदरडे,कळंम,ब्रह्मणे, भिलाली,शहापूर,निम(कपिलेश्वर) या गावांना पुराच्या पाण्याचा धोका असल्याची दाट शक्यता असल्याने मा,जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार प्रांत अधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार जोती देवरे, जिल्हाआपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसिग रावळ, हे शोध बचाव साहित्यासह वन्यजीव संस्थेचे स्वयंसेवक (सर्पमित्र)-सतिष कांबळे,स्कायलेब डिसुजा,शीतल शिरसाळे, जळगावचे-मनपा- अग्निशमन दलाचे अश्वजित घरडे,प्रकाश चौव्हान,तेजस जोशी, यांच्या पथकासह वरील गावांमध्ये प्रत्यक्ष जावुन ग्रामस्थांना वाढणाऱ्या पुरापासून बचाव व सुरक्षेच्या दृष्टीने सतर्कतेचा व सावधानतेच्या सूचना तसेच गावातील शाळांमध्ये स्थलांतरित करण्याची व्यवस्था पाहत आहे, तसेच अतिदक्षतेच्या दृष्टीने वरील यंत्रणा आज रात्रभर शोध व बचाव पथकासह या भागात गस्त घालत असून दक्षता घेत राहणार आहे.