अमळनेर(प्रतिनिधी ) येथील मतदार संघातील आमदार शिरीष चौधरी यांच्या अथक प्रयत्नातून अमळनेर व पारोळा तालुक्यातील गावामध्ये निधीची सतत बरसात होत असल्याने विकासाची गंगा अवतरत असून विकासाचा अनुशेष भरून निघत आहे, आता पुन्हा मतदारसंघातील रस्ता कॉंक्रीटी करणे, पेव्हरब्लॉक बसविणे, गटार, सामाजिक सभागृह, सभामंडप, स्मशानभुमी, देवमढी,संरक्षक भिंत, इ. विकास कामांसाठी ५ कोटींच्या एवढा भरघोस निधी गावांतर्गत आवश्यक कामांसाठी उपलब्ध झाला असल्याची माहिती आमदार शिरीषदादा चौधरी यांनी दिली आहे.
यासाठी मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, नियोजन व वित्तमंत्री ना सुधीर मुनगंटीवार व ग्रामविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे, यांचे विशेष सहकार्य लाभल्याने आ चौधरी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.सदर निधीतून खालील प्रमाणे विकास कामे मार्गी लागणार आहेत.
गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण/ पेव्हरब्लॉक बसविणे
मांडळ १० लाख, दहिवद १० लाख, पातोंडा २० लाख, अमळगाव ३० लाख, सावखेडा १० लाख, जळोद १० लाख, लोणे १० लाख, मोहाडी १० लाख,डांगरी १० लाख,पाडळसे १२ लाख,निंब १० लाख,मारवड २० लाख,जैतपिर १० लाख, जुनोने १० लाख, खेडीढोक ५ लाख, पिंपळकोठा १० लाख, वसंतनगर १० लाख,बहादरपूर २० लाख,शिरसोदे १० लाख, महाळपुर १० लाख,शेळावे बु ५ लाख, मुडी प्र डा गायदेवी मंदिराजवळ ५ लाख, निभोरा १० लाख,पिपळी प्र ज १० लाख,रामेश्वर बु ५ लाख, रामेश्वर खु ५ लाख, भोरटेक १० लाख,बहादरवाडी ५ लाख,हिंगोणे खु प्र अ १० लाख, खापरखेडा ५ लाख,कंकराज ५ लाख,
स्मशानभूमी
मुडी प्र डा १५ लाख,एकतास १० लाख,पिंगळवाडे १० लाख,
सामाजिक सभागृह
ढेकू बु तुळजाभवानी मंदिराजवळ १० लाख,देवगाव देवळी इच्छादेवी मंदिराजवळ १० लाख,करणखेडे पारधी समाज वस्तीजवळ १० लाख, धार येथे अनुसूचित जाती वस्तीलगत १० लाख, शिरूड येथे माळी समाज वस्तीलगत १० लाख, नाद्री येथे १० लाख, निभोरा येथे १० लाख,पिळोदा येथे १० लाख, रामेश्वर येथे १० लाख,
देवमढी
गोवर्धन ६ लाख,पळासदडे 6लाख, गलवाडे बु ६ लाख,
संरक्षक भिंत
अमळगाव १० लाख,एकतास ५,खेडीढोक ५ लाख, बोहरा ५ लाख,
गटार बांधने
मुडी प्र डा १० लाख,आदीप्रमाणे विकास कामे होणार असून कार्यकारी यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग राहणार असल्याचे आमदारांनी म्हटले आहे आहे. यामुळे ग्रामीण भागात आवश्यक ती विकासकामे मार्गी लागणार असून याचा लाभ ग्रामस्थांना होणार आहे.तसेच ग्रामीण भागातील गावांतर्गत सुविधांचा अनुशेष भरून काढण्यासाठी आ शिरीष चौधरी यांनी शासनाकडे अजून ५ कोटींचा प्रस्ताव दाखल केला असून यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत, सभामंडप, सभागृह, काँक्रीट रस्ता, गटारी, प्रवेशद्वार, आदिवासी समाजमंदिर, संरक्षक भिंत, स्मशानभूमी,दफनभूमी, आदी कामे प्रस्तावित आहे, लवकरच त्यांना मंजुरी मिळेल आणि विकासाचा आलेख अजून वाढेल असा विश्वास आ चौधरी यांनी व्यक्त केला आहे.