अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील जानवे येथे आमदार सौ स्मिता वाघ यांच्या निधीतून विविध कामांचे भूमिपूजन व विकासकामांचा लोकार्पण सोहळा अतिशय उत्साहात पार पडला,ग्रामपंचायत कार्यालय,ट्रीमिक्स रस्ता,संरक्षण भिंत, आणि गावातील रस्ता काँक्रिटिकरण आदी विकासकामांचा यात समावेश आहे.यामाध्यमातुन एकूण 42 लाखांचा निधी आ सौ वाघ यांनी जानवे गावांसाठी दिला आहे.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ वजाबाई भिल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल पवार, आत्मा कमेटी चे अध्यक्ष श्रीनिवास मोरे,भाजपा तालुका सरचिटणीस जिजाबराव पाटील,शहर सरचिटणीस उमेश वाल्हे,वाघोदा उपसरपंच कीर्तीलाल पाटील,गटप्रमुख राजेश वाघ, निसरडी येथील लोकनियुक्त सरपंच रावसाहेब पाटील,कळमसरेचे प्रविण चौधर भूषण जैन, पाडळसरे चे अरूण पाटील यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांचा सत्कार जानवे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच,व सर्व सदस्यांनी केला,आ स्मिता वाघ यांचा विशेष सत्कार पंचायत समिती सदस्या सौ रेखाताई नाटेश्वर पाटील यांनी केला,कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्रकाश विक्रम पाटील हे होते, यावेळी भारतीय जनता पक्षाचे शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान आ सौ स्मिता यांच्या माध्यमातून ग्रामिण विकासाचा आलेख वाढत असून यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.