अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील स्व. सौ. पद्मावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालय येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शताब्दी जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव नरेंद्रभाऊ मुंदडा , पंचायत समिती शिक्षण विभाग विषय तज्ञ श्री. प्रमोद पाटील उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एस.विंचूरकर होते. मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक , व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
आजच्या दिवसाचे औचित्य साधून विद्यालयात वृक्षारोपण, विद्यार्थी गुणगौरव, बक्षीस वितरण आणि वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली, चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला .आजच्या दिनाचे औचित्य साधून शाळेतील करुणा क्लब अंतर्गत वृक्षारोपण , व मंगळ ग्रह संस्थान कडून मिळालेल्या दप्तरांचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, इ 10 चे गुणवंत विद्यार्थी हर्षदा माळी, प्राची बिह्राडे , विलास पारधी , तसेच उत्कृष्ट करुणा कार्य करणारे कु गौरी पाटिल , आदित्य भावसार व वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोकुळ बोरसे , सुत्रसंचलन सौ वंदना पाटिल , आभार श्री प्रदिप चौधरी यांनी केले , यशस्वीतेसाठी सौ स्वाती पाटिल , सौ किर्ती सोनार , गोकुळ पाटिल , सागर महाजन, राहुल पाटिल , श्री प्रकाश पाटिल , सौ रुपाली महाजन , राहुल पाटिल यांनी सहकार्य केले वंदे मातरम ने सांगता झाली.