अमळनेर (प्रतिनिधी) सर्व सामान्य कार्यकर्त्यांची जाण ठेवणारा असामान्य नेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १ ऑगष्ट रोजी मुंबई येथे मातोश्री भवनात जळगांव जिल्ह्यांतील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, व तालुकाप्रमुख या निवडक प्रमुख पदाधिकाऱ्यांची वैयक्तिक बैठक पक्षप्रमुख मा उद्धवजी ठाकरे यांनी घेतली होती , येणाऱ्या विधानसभा निवडणूक संदर्भात पदाधिकाऱ्यांची मनोगत व सूचना मार्गदर्शनही त्यांनी केलं. अमळनेरचे तालुकाप्रमुख विजय पाटील यांचा वाढदिवस असल्याने त्यांना सेल्फी देण्याबाबत पदाधिकारीनी विनंती केल्याने मा पक्षप्रमुखांनी वाढदिवस केक मागवून त्या पदाधिकारीचा वाढदिवस मातोश्रीत सर्व सहकारी सोबत साजरा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला व सर्व सामान्य कार्यकर्त्यांची जाण असलेला नेता कसा असावा याचे प्रत्येय दिले.सदर प्रसंगी ठाण्याचे खासदार राजन विचारे ,शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर,जळगावचे दोन्ही लोकसभेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ,चंद्रकांत पाटील , संपर्कप्रमुख दिपक पाटील,उपजिल्हाप्रमुख डॉ राजेंद्र पिंगळें अमळनेर,डॉ हर्षल माने पारोळा, मुन्ना पाटील चोपडा यावल,तालुकाप्रमुख वासुदेव पाटील एरोंडोल ,प्रा बी आर पाटील पारोळा,राजू चव्हाण जळगांव ग्रामीण, जळगांव महानगर प्रमुख शरद तायडे सह आदी पदाधिकारी उपस्थित होते, मतोश्रीत 30 वर्षात प्रथमच गेलेले व एवढा बहुमान प्राप्त झाल्याने शिवसेनेत केलेल्या आम्ही आतापर्यंतच्या कार्याचे सार्थक झाल्याचे अमळनेरचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉ राजेंद्र पिंगळें व तालुकाप्रमुख विजू मास्तर यांनी आभार व्यक्त केले.