अमळनेर-येथील अॅड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल च्या वतीने अमळनेर शहरात वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आलेले होते.यावेळी शाळेतील इयत्ता 5 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवित पर्यावरण संवर्धनाचा व वृक्षारोपणाचा संदेश दिला.वृक्षदिंडीला बालेमिया चौकापासुन सुरुवात झाली तेथुन पवनचौक,वडचौक,शिरुड नाका,भगवा चौक,अन्नाभाऊ साठे चौक,विश्रामगृह व बस स्थानक येथे दिंडीचा समारोप करण्यात आला.सुरुवातीला साहित्यरत्न अन्नाभाऊ साठे याना जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी मानवाच्या जिवनातील असलेले निसर्गाचे स्थान पटवून देत पर्यावरणाच्या र्हासामुळे भविष्यात सजीव सृष्टीला जो धोका निर्माण झालेला आहे तो टाळण्यासाठी वृक्षांची मोठ्या प्रमाणात होत असलेली कत्तल थांबवून प्रत्येकाने वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचे कार्य हाती घेण्याबाबतचे पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर केले.वृक्ष दिंडीत विद्यार्थ्यांनी वक्षतोड थांबवा,जगूया आणि जगवूया,प्रदुषण टाळा पर्यावरण सांभाळा,पर्यावरण का रखे ध्यान तभी बनेगा देश महान,पेड वर्षा लाते है गर्मी से यह बचाते है,पर्यावरण बचे तो प्राण बचे असे घोषवाक्य देत त्यांचे फलक विद्यार्थी नागरिकांना दाखवत जनजागृती करीत होते.
भरपावसात विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य नागरीकांचे लक्ष वेधून घेत होते म्हणुन उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे व शाळेचे कौतुक केले. यावेळी शाळेचे प्राचार्य विकास चौधरी,प्रशासन अधिकारी अमोल माळी यांच्यासह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.सुरक्षेसाठी अमळनेर पोलीस स्टेशनच्या कर्मचारी बाधवांचे सहकार्य लाभले.