व्यायामशाळा,सामाजिक सभागृह आणि देवमढीचा समावेश,
अमळनेर -तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथे आ.शिरीष चौधरींच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आ.चौधरींच्या हस्ते करण्यात आले.यावेळी हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रविंद्र चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यात पिंपळे बु येथे व्यायाम शाळा इमारत,पिंपळे खु.येथे सामाजि क सभागृह,आणि चिमणपुरी येथे आदिवासी देवमढी आदी विकास कामांचा समावेश असून मोठ्या उत्साहात हा भूमीपूजन सोहळा पार पडला. सुरवातीला आ चौधरीं यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले,यानंतर भूमिपूजन पार पडले.यावेळी पिंपळे येथील रहिवासी तथा शेतकी संघाचे माजी अध्यक्ष संजय पुनाजी पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,तिन्ही गावांच्या परिसरा त पाण्याची बिकट अवस्था असल्याने पिंपळे ग्रामस्थांनी आ शिरीष चौधरींची भेट घेऊन काहीतरी उपाययोजना करण्याची विनंती केली होती, यामुळे आ चौधरींनी माळण नदीच्या खोलीकरणाचे कार्य हाती घेऊन हिरा उद्योग समुहाच्या स्वखर्चातून, पिंपळे परिसरात माळण नदीचे खोलीकरण करून गाळ काढण्यात आला,यांचेच फलित म्हणून यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण परिसर जलमय झाला असून आम्ही सर्व ग्रामस्थ आमदारांचे सदैव ऋणी राहू अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक कल्याण पाटील, आर्डी उपसरपंच किशोर पाटील, सावखेडे मा सरपंच राजेंद्र पाटील, शिरसाळे मा सरपंच सुदाम शिरसाळे, पिंपळे खु सरपंच दिनेश पाटील, पिंपळे बु सरपंच सुभाष चव्हाण,रमेश पाटील, उमेश पाटील, योगेश पाटील, स्वप्नील पाटील, उपसरपंच प्रमोद घोडके, सरपंच राहुल चव्हाण, विश्वास पाटील,किशोर सैदाने,जयवंत पाटील, भाऊसाहेब पाटील, पितांबर पाटील,संतोष चौधरी, नरेंद्र चौधरी, निबा चौधरी, हरी पाटील,भूषण पाटील,सचिन पाटील, जयवंत पाटील, युवराज पाटील, ज्ञानेश्वर पाटील आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.