अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणातील आरोपी धुळे येथील निष्पन्न झाला असून पोस्को कायद्यानुसार त्याला अटक करण्यात आली होती
त्याला बुधवारी जिल्हा सत्र व अति न्या व्ही आर जोशी जिल्हा न्यायाधीश यांनी २ दिवस पोलीस कोठडी दिली असून युक्तिवाद सरकारी वकील किशोर बागुल यांनी केला
बुधवारी न्यायालयात मंगरूळ येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा शाहरुख जावेद बेग यास हजर केले होते
मंगरूळ येथील अल्पवयीन तरुणीला एका अज्ञात इसमाने पळवून नेले होते पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर , हेडकॉन्स्टेबल सुभाष महाजन , पोलीस भूषण पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून धुळे येथील शाहरुख जावेद बेग वय २२ रा मोतीनगर धुळे याने त्या तरुणीला पळवून नेले होते आणि घरात लपवून ठेवले होते त्यानुसार आरोपी व पीडित तरुणी दोघांना धुळे येथून ताब्यात घेतले मुलीच्या जबाब वरून शाहरुख विरुद्ध अपहरण व पोस्को कायद्यांव्ये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे तर मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.