जिजाऊ बहुद्देशिय संस्थेच्या वतीने मार्गदर्शक व्याख्यानाचे आयोजन…

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील जिजाऊ बहुद्देशिय संस्थेच्या वतीने फिनिक्स सोशल अवेरनेस गृपचा सातवा वर्धापन दिन औचित्य साधून सालाबादाप्रमाणे मार्गदर्शक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा जेष्ठ व्याख्याते प्रा वसंतराव पुरके यांचे तरुणाईचा जागर व प्रजासत्ताक भारताचे नैतिक मुल्य ह्या विषयावर व्याख्यानाचे आयोजन दि 26 जुलै शुक्रवार रोजी दुपारी 4 वा मराठा मंगल कार्यालयात करण्यात आलेले आहे.कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेच्या अध्यक्षा अॅड ललिता पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
अमळनेर शहर व तालुक्यातील जेष्ठ तसेच युवक युवतींच्या विकासासाठी जिजाऊ बहुद्देशिय संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते त्यातील एक असा मार्गदर्शक व्याख्यानाचा कार्यक्रम गेल्या सात वर्षांपासुन आयोजीत करुन विविध व्याख्याते व साहित्यिकां मार्फत वैचारीक मेजवानी देण्याचे कार्य निरंतर सुरु आहे.म्हणुन या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिजाऊ बहुद्देशिय संस्था व फिनिक्स सोशल अवेरनेस गृपच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *