अमळनेर तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंचांची २६ जुलै रोजी बैठक

शिर्डीत ३१ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित मेळावा

अमळनेर(प्रतिनिधी) शिर्डी येथे ३१ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्व सरपंच, उपसरपंच यांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला जाण्यासाठी तालुकास्तरीय बैठकीचे २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला अमळनेर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
शिर्डी येथील सरपंच,उपसरपंच मेळाव्यास जाण्यासाठी उपस्थित राहणयाचे केले आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी महाराष्ट्रातील सर्व सरपंच, उपसरपंच यांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळावा आयोजित केला आहे. यासंदर्भात अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष पुरूजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारींच्या सहकार्याने प्रत्येक तालुक्यात मेळाव्यास जाण्यासाठी तालुका स्थरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत गटविकास अधिकारी अजयकुमार नष्टे, सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथील पंचायत समितीच्या पूज्य सानेगुरुजी हाॅलमध्ये २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अमळनेर तालुका अध्यक्ष सुरेश अर्जुन पाटील, महिलाध्यक्ष उज्ज्वला महेश पाटील, तालुका उपाध्यक्ष कोकिळाबाई रामपुरी गोसावी, सदस्य नरेंद्र पाटील, मधुकर पाटील, दिनेश पाटील, अॅड अमोल ब्रम्हे, चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच तालुक्यातील सरपंच, उपसरपंच यांनी अमळनेरच्या बैठकीसह शिर्डी येथील मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *