अमळनेर (प्रतिनिधी)मा.आ.ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू संस्थापक अध्यक्ष प्रणित प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग क्रांती आंदोलनास मोठे यश मिळाले असून आज रोजी अमळनेर नगरपरिषद मार्फत दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यात आली.
प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष पंकज पाटील व प्रहार अपंग क्रांती संस्था शहराध्यक्ष योगेश पवार यांनी नोव्हेंबर २०१७ पासून नगरपरिषदेस निवेदन देऊन दिव्यांग बांधवांसाठी ३%निधी राखीव ठेवून तो दिव्यांगांसाठी खर्च करण्यात यावा. यासाठी आंदोलन व लेखी तक्रारी अमळनेर नगरपालिकेत केल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी या दिव्यांग विषयाचे गांभीर्य बघता नगरपरिषदेस मार्गदर्शन करत लोकनियुक्त नगर अध्यक्षा मा.सौ.पुष्पलताताई साहेबराव पाटील व मुख्याधिकारी सौ.शोभा बाविस्कर यांनी सकारात्मक चर्चा करून चालू वित्तीय वर्षा साठी १३४ लाभार्थींना प्रत्येकी ७००० प्रमाणे ९ लाख ३८ हजार रुपये लाभार्थी बँक खात्यात जमा करून जळगाव जिल्ह्यातील पहील्या क्रमांकावर अमळनेर च्या इतिहासात पहिल्यांदा अपंग निधी वाटप करण्यात आला.
.
खचून न जाता हिमतीने काम करा – लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील
जीवन जगत असतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याची जाणीव आम्हास असून अपंगावर मात करून अनेकजण छोटा मोठा व्यवसाय करून पुढे जात आहेत. ही अभिमानास्पद बाब आहे. जगात सर्व सुखी असा कोणीच नाही,जेवढे सुख ! तेवढेच दुःख हे परमेश्वराने कोणत्या ना कोणत्या रुपाने दिलेले आहे. आपण दिव्यांग आहोत म्हणून खचून न जाता हिंमतीने मार्गक्रमण करा, यश तुमच्या पाठीशी आहे. अमळनेर नगरपरिषद सदैव आपल्या पाठीशी राहण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आश्वासन लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांनी निधी वाटपाप्रसंगी दिले. यासाठी नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी , नगरसेवक, नगरसेविका , मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या स्तुत्य उपक्रमाप्रसंगी रज्जू नेमिचंद जैन, शोभा लालचंद परदेशी, शुभम राजेंद्र झिंबर, मंगल धुडकु जैन, मंगला प्रल्हाद माळी, जुबेर खान , साहीराबी पिंजारी, चेतन शंकर महाजन आदि लाभार्थ्यांसह अॅड.कविता पवार , शशिकांत सूर्यवंशी, पंकज पाटील, योगेश पवार आदी उपस्थित होते.