अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे २३ रोजी सकाळी शनीपेठ ताडेपुरा भागात छापा टाकून सुमारे २३ लाख रुपयांचा गुटखा वाहून नेणारा आयशर ट्रक ताब्यात घेऊन चालक सह क्लिनरला अटक करण्यात आली आहे .
पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व पोलीस उपनिरीक्षक आर जी माळी यांना शहरात शनीपेठ भागात ट्रकभर गुटखा आला असल्याची माहिती मिळताच त्यांनी स्वतः व पोलीस नाईक मिलींद भामरे,पोलिस नाईक ईश्वर सोनवणे, पोना संजय पाटील, पोना शरद पाटील, पोना किशोर पाटील, पोना मधुकर पाटील, पोकॉ सुनिल पाटील, पोकॉ योगेश महाजन,भटूसिंग तोमर याना घेऊन २३ रोजी अमळनेर शहरात चोपडा रोडवर शनी मंदिराजवळील रस्त्यावर अमळनेर शहराकडे जाणारे एक वाहन क्र. MH-45-=-5462 आयशर ट्रक थांबविले असता वाहन चालक . समर्थ कौशल जटाशंकर कौशल वय २१ वर्ष रा.होळी चौक सिमरोळ गुजरखडा महु जि इंदौर व रोहीत हरिष तिवारी वय २१ वर्ष सदर वाहनावरील क्लीनर रागुजरखेडा मह जि इंदौर हे आढळूनआले. वाहनाची झडती घेतली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला अन्न पदार्थ साठा केलेला आढळुन आला त्यात विमल पानमसाला चे एकुण ६० गोण्या ज्यात १२००० पाकीटे आढळुन आला. तसेच व्ही १ सुंगधित तंबाखु चे एकुण २ गोण्या प्रत्येकी ५०० पाकीटे त्यानुसार सदर दोन्ही इसम व वाहनासह मुद्देमाल घेवुन पोलीस स्टेशन अमळनेर येथे आणण्यात आले असा एकुण साठा किंमत रु.२२.९९०००/- आढळुन आला चालकाने हा माल कुठून आणला व कोणाकडे घेवुन जात होते. त्याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी कोणतेही उत्तर देण्यास नकार दिला. तसेच सदर मालाचे कोणतेही चलन अथवा बिल दाखविले नाही. म्हणून अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे यांच्या फिर्यादीवरून अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कलम २६चे २ चे आय सहकलम ३ चे १ चे झेडझेड चे आय सह नियमन शिक्षा कलम ५९ तसेच सदर कायदयाच्या कलम ३० चे २ चे ए सहकलम २७ चे ३ चे डी व ई सह अन्न सुरक्षा आयुक्त, मुंबई यांचे शासन अधिसुचना दि २०.०७.२०१९ चे उल्लंघन करुन शिक्षा कलम ५९ प्रमाणे गुन्हा केला आहे. तसेच भारतीय दंड विधान कलम १८८, २७२.२७३.३२८.३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे चालक व क्लिनर दोघांना अटक करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक आर जी माळी करीत आहेत.